सोयगाव तालुक्यात अवकाळीच्या नुकसानीचे ६३ टक्के पंचनामे पूर्ण ; महसूल व कृषिचे संयुक्त मोहीम

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

सोयगावसह तालुक्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचे ६३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून अद्यापही सुट्टीच्या दिवशीही महसूल कृषीच्या संयुक्त पथकाची मोहीम सुरू असल्याचे महसूल विभागाने सांगितले दरम्यान सोयगाव तालुक्यात तीन दिवसात तब्बल दोन हजार सहाशे ७६ हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये अवकाळीच्या नुकसानी मध्ये पाच हजार सातशे अंशी शेतकऱ्यांची बाधित म्हणून नोंद करण्यात आली आहे शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस ही पंचनामा मोहीम सुरू होती सोमवारी दि.२७ ते बुधवारी दि.२९ तीन दिवस ऑफ लाईन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येईल त्यामुळे पुन्हा बाधित क्षेत्रासह शेतकरी संख्येत वाढ होईल
सोयगाव तालुक्यात अवकाळीच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात ६३ टक्के अवकाळीच्या नुकसानी चे पंचनामे झाले आहे गेल्या चार दिवसापासून महसूल, कृषी आणि पंचायत समिती च्या त्रिसदस्यीय पथकाच्या बारा टीम कार्यरत करण्यात आल्या आहे या बारा टीम मध्ये ३६ कर्मचारी ग्रामीण भागात अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करत आहे सोमवार पासून ऑफलाइन प्राप्त झालेल्या तक्रारीचा पंचनामे हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे प्राथमिक अहवालानुसार अवकाळीच्या ६३ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.

सज्जे निहाय ऑफलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या आहे त्या नुकसानीच्या तक्रारी मागवून त्यांचे फेरतपासणी करून त्या तक्रारी वरून पंचनामा करण्यात आल्यावर अवकाळीच्या बाधित शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल असे कृषी अधिकारी संपत वाघ यांनी सांगितले.

अवकाळीच्या नुकसानी च्या मदतीचे निकष ठरेना
अवकाळीच्या नुकसानी मध्ये बाधित झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असून मात्र रब्बीच्या हंगामातील अवकाळीच्या फटका बसलेल्या पिकांच्या नुकसानभरपाई साठीचा कोरडवाहू, बागायती आणि फळपिके यांच्या नुकसानी चा निकष व नुकसान भरपाई साठी देण्यात येणारी मदतीची हेक्टरी नुकसान भरपाई साठीचा निकषही ठरलेल्या नाही त्यामुळे रब्बीचा नुकसानी मध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काय मदत मिळणार हे अद्याप ठरलेले नाही . पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर नुकसानीच्या।मोठ्या प्रमाणावर तक्रारी बाधित शेतकऱ्यांनी केल्या आहे रब्बीचा विमाधारक शेतकरी संख्या ७९५ आहे यापैकी १३६ नुकसानी च्या तक्रारी प्राप्त आहे त्यामुळे रब्बीचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानी ची भरपाई मिळणार का याबाबत शेतकरी सांदिग्ध झाले आहे.
कोट-१) ७२ तासांच्या आत नुकसानी ची तक्रार पोर्टलवर करणे आनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर नुकसानी ची माहिती कंपनी ला दिली असल्यास विमा भरपाई साठी बाधित शेतकरी पात्र होतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here