साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राज्यात आदर्श ठरावा असा शासकीय जत्रेचा उपक्रम खासदार उन्मेष पाटील यांनी ते चाळीसगावचे आमदार असताना राबविला होता. ज्यात एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी हजारो नागरिकांना मिळवून दिला होता. त्यावेळी ‘उन्मेष पॅटर्न’ म्हणून ओळखल्या गेलेला हा उपक्रम आता राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसगाव (Jalgaon) येथे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात २७ ते २९ ऑगस्ट २०१९ असा तीन दिवस शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबवला होता. ज्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी वंचित असलेल्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला होता. सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून लाखो लोकांना…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगांव प्रतिनिधी महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जरंडी ग्रामपंचायत व बोद्धविहार येथे साजरी करण्यात आली जरंडी येथे सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तर बोद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपसरपंच संजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर लोटन पाटील,मधुकर सोनवणे, दिलीप श्रीराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,बनेखा तडवी, अमृत राठोड, प्रकाश पवार,राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील लिपिक संतोष पाटील, सतीश बावस्कर,सुरेश चनाल,एकनाथ गायकवाड,भागवत माळी, सुखराम टेलर, सिद्धार्थ मोरे,संतोष मोरे,प्रदीप जगताप,यशवंत कोतकर,संतोष सोनवणे,अशोक साबळे,ज्ञानेश्वर मोरे,समाधान मोरे, कडूबा निकम,सुभाष…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शिवाजीरोड वरील नगरपरिषद मुख्यालय समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला . सदर घटना अशी की संगीता उगले यांच्या स्कॉलर पॉईंट हे स्टेशनरी स्टोअरचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी इसम पेन घेण्याच्या बहाण्याने आला.पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे म्हणत पत्ता विचारला त्यात उगले यांनी सदर पत्ता माहीत नसल्याचे सांगितले.दरम्यान सुट्टे पैसे देत असताना त्यात चिल्लर समाविष्ट होती.त्यातून एक रुपयाचा डॉलर काऊंटरच्या आतील बाजूस संशयिताने मुद्दाम पाडला. उगले या तो डॉलर देण्यास खाली वाकल्या बरोबर आरोपीने काहीतरी वस्तूच्या आधारे…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी मोबाईलमधे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याच्या प्रियकराकडून वारंवार मिळणा-या धमकीला वैतागून सतरा वर्षाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पहुर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर तालुक्यातील लाखोली येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हटले आहे की, संशयीत हा मयत मुलीला नेहमी तु माझ्यासोबत एकत्र रहा नाहीतर मी आपले मोबाईलमधे काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करेन अशी धमकी द्यायचा ‘ त्या ‘ मुलाकडून आत्महत्या करणा-या मुलीला नेहमी त्रास सहन करावा लागत…
एकीकडे आपले फोन अधिक स्मार्ट होत असताना नवनवीन अपडेट्स त्यात येत आहेत. त्यात सर्वकाही डिजीटल होत असल्याने मोठमोठे महत्त्वाचे व्यवहारही आजकाल फोनवरुनच होतात. त्यामुळे छोट्या मोठ्या पेमेंटपासून ते मोठमोठे व्यवहारही आजकाल फोन बॅकिंगमधून होत असतात. त्यात फोनच्या वाढत्या वापरामुळे आपले सर्व महत्त्वाचे डॉक्यूमेंट्सही फोनमध्ये असून अशा परिस्थितीत फोन हॅक झाल्यास मोठा तोटा होऊ शकतो. त्यात तुम्ही अॅपल युजर असाल तर कंपनीच्या दाव्यानुसार अॅपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे, पण याचा अर्थ आयफोन हॅक होऊ शकत नाही असा नाही. त्यामुळेच अॅन्ड्रॉईड किंवा आयफोन कोणताही फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर काही सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्यापूर्वी फोन…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र, करिअर कट्टा व द युनिक अकॅडमी, पुणे शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदवी काळात एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी ?’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द युनिक अॕकेडमी पुणे, जळगाव शाखेचे प्रमुख विकास गिरासे व अतिथी नरेंद्र पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर. आर. पाटील यांनी…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी गेल्या १६ वर्षापासून प्रदीर्घ लढा देत आहे. संबंधित विभागाने निव्वळ आश्वासने देऊन एवढे दिवस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. गेल्या 23 मार्च रोजी शेतकरी संघटनेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकारी संचालक मंडळे यांनी आश्वासन दिले की मी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्च महिना अखेरीस निधी उपलब्ध राहिला तर पैसे देईन त्याचा पाठपुरावा म्हणून परत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी जमलेली कार्यालयातील गर्दी बघून तातडीची मीटिंग लावून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून येत्या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. यातील बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील ( वय – ५५ ) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे रामनवमी निमित्ताने बस स्थानकाजवळील संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या गरजूंना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, विश्वनाथ चतुर, पत्रकार धन्यकुमार जैन, महावीर सैतवाल, महेश चौधरी यांचेहस्ते मिष्टान्न भोजन वाढण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभ आरंभ फाऊंडेशनचे संस्थापक चंदन जैन, अध्यक्ष विक्रांत पाटील, दर्शन काळे, शशिकांत गोरे, पवन जैन, योगेश काळे, पराग अत्तरदे, निखिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
साईमत लाईव्ह उमरगा प्रतिनिधी उमरगा पोलीस स्टेशनचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक एम.ए.राठोड यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या आकरा महिन्यात उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीत सहा खून, तर तितकेच खुनाचे प्रयत्न झाले आहेत तर हाणामाऱ्या, चोऱ्या, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी, जेष्ठ नागरिकांना फसवून सोने लूट करणे अशा घटनात वाढ झाल्याने लोकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरगा शहर व आसपासच्या भागातील सर्व जाती – धर्मातील लोकांनी सामाजिक सलोखा जपत उमरगेकरांनी संपूर्ण राज्याला शांतताप्रिय तालुका असल्याचे संदेश दिला आहे. कांही अपवाद वगळता जातीय सलोखा अखंड असतो. मात्र गेल्या वर्षभरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम घालण्याचे आव्हान पोलिस…