Author: Saimat

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर ते शेंदुर्णी दरम्यान आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिरची स्कूल बस उलटली या अपघातात विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली, पहूर येथील विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर शाळेत नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेची स्कूल बस क्रमांक दोन ही विद्यार्थ्यांना घेऊन शेंदुर्णीतील शाळेत घेऊन जात असताना पहुर शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा दर्ग्याजवळ वळण घेत असताना स्कूल बसला अपघात झाला, या अपघातात शाळेच्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे. बस मध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते यातील 30 विद्यार्थ्यांना व दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक शहरातील एक ध्येयवादी,सामाजिक बांधिलकी सांभाळणारी व उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारी नामवंत शिक्षण संस्था आहे. ‘विद्या यश सुखकरी अर्थात विद्या यशोदायी असते,सुखदायी होते’ हे आपले ब्रीदवाक्य सतत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून प्रत्यक्षात आणणारी आदर्शवत शिक्षण संस्था आहे. वर्धापन दिनाचे निमित्ताने संस्थेचा आढावा…. कुठल्याही संस्थेच्या वाटचालीत शंभर वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असतो. गेल्या शंभर वर्षाचा संस्थेचा प्रवास हा सृजन आणि देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे निरलस वृत्तीने केलेल्या सेवा कार्याचा आहे. आद्य संस्थापकांनी ज्या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून संस्था सुरू केली, त्याच मार्गावरून गेली शंभर वर्ष संस्थेची वाटचाल सुरू आहे. ज्ञान हेच सर्वोच्च…

Read More

साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी नांदुरा अर्बन बँक  सद्यस्थितीत या ना त्या कारणाने चर्चेत असून आज बँकेत पार पडलेल्या कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीच्या बैठकीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निलंबनाचा विषय येताच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोसेडींग घेऊन पळत निघाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत वृत्त असे की २९ मार्च रोजी बँकेच्या मुख्यालयात कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीची बैठक बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव यांच्या अध्यक्षते खाली सुरु होती. या बैठकी दरम्यान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रप्रसाद रामकेवल पांडे यांचे सर्वानुमते निलंबन करण्याचे आदेश काढण्याचा विषय येताच  त्यांनी सदर कर्मचारी समितीचे प्रोसेडींग सभा चालू असतांना सदस्यांच्या सह्या…

Read More

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात लाचखोरी थांबण्याचा नाव घेत नसून, काल तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सिन्नर येथील खासगी सावकारावर सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात तब्बल २०  लाखांची लाच स्वीकारताना निबंधक कार्यालयातील सहाय्यक तालुका निबंधक रणजित महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पाटील हे निफाड येथे सहाय्यक तालुका निबंध म्हणून पदभार सांभाळत आहे अजून सिन्नरचाही पदभार त्यांच्याकडे आहे. यापूर्वी सिन्नर येथील तालुका निबंधकही जाळ्यात सापडल्याची चर्चा…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी पहूर पेठ येथील वाघुर नदी तीरावर सार्वजनिक स्मशानभूमीलगत होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले घंटानाद आंदोलन  आज बुधवारी  मागे घेण्यात आले .        याबाबत सविस्तर वृत्त असे की , वाघुर नदीच्या तीरावर पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत  सार्वजनिक स्मशानभूमी असून या स्मशानभूमीलगत शेजारील शेतकऱ्याकडून अतिक्रमण होत असल्यामुळे सदर अतिक्रमण काढण्यात यावे , या मागणीसाठी वाघूर विकास आघाडी आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालया शेजारी घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते . काल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीची पाहणी करून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे पत्र दिले…

Read More

साईमत लाईव्ह आमोदा प्रतिनिधी आमोदा येथील श्रीराम मंदिरामध्ये सात दिवस झाले ध्वजारोहण व हनुमान ध्वजपूजन कलश यात्रा दिंडी सोहळा रामचरितमानस पारायण व नवान पारायण महंत कन्हैया दाजी महाराज यांच्या अमृतवाणीतून झाले आज रात्री राम जन्मोत्सवानिमित्त भजन व श्रीराम जन्माचे ह भ प मनोज महाराज दुसखेडा यांचे जाहीर कीर्तन होणार आहेतसेच दुपारी महाप्रसाद अन्नदाते कै आप्पासाहेब घनश्याम काशीराम पाटील यांच्याकडून होणार आहे. संपूर्ण भगवान श्रीराम मंदिर हे फुलांनी व लाइटिंग ने सजवलेले आहे. अशी आख्यायिका आहे की सदरहून श्रीराम मंदिरमंदिराची स्थापनास्वामी शंकर पुरी महाराज आत्मचरित्र कथा गावातील ज्येष्ठ नागरिकयांच्या सहवासातून मिळालेल्या माहितीनुसारओम श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक सचिन आनंद व ब्रह्मकालीन साधू…

Read More

एअरटेलकडून 5G सर्विस ला ५०० हून जास्त शहरात रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, एअरटेलकडून सद्या ५जी रिचार्ज प्लानला लाँच करण्यात आले नाही. परंतु, असे नाही की, तुम्ही फ्री मध्ये 5G सर्विसचा वापर करू शकाल. जर तुम्ही एअरटेल ५जी सर्विसचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज करावा लागेल. खरं म्हणजे कंपनीने स्पष्ट केले आहे की, २४९ रुपयांपेक्षा कमी मंथली रिचार्ज प्लानमध्ये ५जी सर्विसचा वापर करता येवू शकणार नाही. भारतात जिओ आणि एअरटेल अशा दोन कंपन्या आपल्या यूजर्सला ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी देशातील अनेक प्रमुख शहरात आपली सेवा रोलआउट केली आहे. एअरटेल देत…

Read More

केंद्र सरकारने स्पॅम आणि फ्रॉड कॉलला रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. सरकारकडून फ्रॉड आणि स्पॅम कॉलने यूजर्सला दिलासा देण्यासाठी प्लान बनवायचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी ट्रायकडून २३ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वसंमतीने एक प्लान बनवला होता. याअंतर्गत कोणताही यूजर आपल्या पर्सनल मोबाइल नंबरचा वापर प्रमोशन किंवा स्पॅम कॉलसाठी करीत असेल तर मोबाइल नंबरला २ वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच त्या पत्त्यावर नवीन सिम कार्ड जारी करण्यात येणार नाही. १० डिजिटचा मोबाइल नंबरसाठी नवीन प्लान याअंतर्गत ट्रायने प्रमोशन कॉलसाठी वेगळे १० डिजिटचा मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत प्रमोशन आणि स्पॅम कॉलला ओळखता आले पाहिजे.…

Read More

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी ( (Marketing And Operations) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२३ आहे. सारस्वत बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार http://www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सारस्वत बँक भरतीचे रिक्त पदासाठी माहिती: सारस्वत बँकेच्या भरती मोहिमेत एकूण १५० रिक्त जागांवर कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्ग पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक तपशीलांसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा. अर्ज करण्यासाठी थेट लिंक…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यातील भाजपच्या जुन्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना आज सकाळी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. १९७३ ला टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून गिरीश बापट  यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. त्यानंतर त्यांना पुणे…

Read More