Author: Saimat

साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या सोनखांब गावाजवळ गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. या अपघातात तालुक्यातील मंगरुळ येथील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे. पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (वय २५) हे ट्रकमध्ये चोपडा नवापूर तालुक्यातील वेले येथून टरबूज भरून सुरतकडे जात होते. नवापूर तालुक्यातील सोनखांब जवळ हा ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. यात ट्रक चालक राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील वैले येथील शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले. यामुळे ट्रकमध्ये…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्रि गावी शेतकऱ्याच्या कापूस मोजणीत मापात केल्या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने दंडात्मक कारवाई केली. प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा गायकवाड यांनी 11000 रुपये दंडाची आकारणी कापूस व्यापाऱ्याकडून केली. यावल तालुक्यात पांढऱ्या सोन्याची म्हणजे कापूस खरेदी करताना मापात पाप करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.एका शेतकऱ्याने कापूस व्यापाऱ्याची लबाडी प्रत्यक्ष पकडून तक्रार केली असता सहाय्यक निबंध सहकारी संस्था चोपडा हे सध्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आहे. त्यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेतली व 11 हजार रुपये दंडाचे आकारणी केली…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल नगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रभारी कारभार सुरू असल्याने लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचा प्रभाव नसल्याने यावल नगरपालिकेतील सर्व कारभार संबंधित ठेकेदार, कर्मचारी,विकासक,मध्यस्थी दलाल आपल्या सोयीनुसार करून घेत असल्याने यावल नगरपालिकेच्या कारभारावर आणि नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात मोठा विपरीत परिणाम झाला आहे. नगरपरिषद मालकीच्या व्यापारी संकुलनातील गाळाधारकांना नोटीसा देऊन सुद्धा संबंधित गाळे धारक आपला गाळा यावल नगर परिषदेला रिकामा करून देत नाही, नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे,त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा वाहतूक करून विलगीकरण व त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ठेक्यात मोठा गैरप्रकार,भ्रष्टाचार दैनंदिन रित्या सर्रासपणे सुरू आहे. यावल शहरातील दैनंदिन…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी नगरपरीषदेचा मुख्याधिकारी यांचा चार्ज तात्पुरता चोपडा नगरपरीषद मुख्याधिकारी यांचे कडे आहे.परंतु यावल येथील लोकसंख्या व नगर परिषदेच्या कामकाजाची व्याप्ती पाहता शहर विकासाच्या दृष्टीने नियोजन शुन्य व विकासात्मक कामे व्यवस्थीत होत नाहीत. पर्यायी यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत केली आहे. चोपडा येथील यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी यांना यावल साठी पुरेसा वेळ मिळत नसल्या कारणाने यावल शहरातील लोकांच्या मुलभुत अडचणी वेळेवर सुटू शकत नाहीत तसेच निवडणुक प्रकीया लांबणीवर पडल्यामुळे नगरसेवक नसुन प्रशासक नियुक्ती आहे,तरी शहरातील अडचणी खुप वाढत असुन त्यांचा निपटारा करणेकामी प्रशासन अपुर्ण…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी शहरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर एका विवाहितेची छेडखानी करून तिच्या पतीला देखील बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ रोजी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर चालत जात असतांना पाठीमागून ४ मुले पिडीतेचा पाठलाग करत होते. त्यापैकी एका उंच मुलांने मला बेबी असा आवाज दिला. तर अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले, चंद्रकात राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, अनिरुध्द उर्फ मोन्याचा भाऊ (पुर्ण नाव माहीत नाही, तिघं रा. अमळनेर) हे सर्व पिडीत विवाहितेचा पाठलाग करत होते. अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले याने पिडीतेच्या डाव्या…

Read More

साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी  कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. या विजयानंतर धंगेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नव्हता. सगळ्या पक्षामुळे भाजप निवडून येत होता. ही निवडणूक जनतेने  हातात घेतली होती. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाला आहे. कसबा भाजपचा गड नाही तर हा गड जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली. या विजयाचं श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनंच मला निवडून आणलं…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल न.पा.कॉम्प्लेक्स मध्ये ताडी विक्री दुकानाचा परवाना जो दिला ‘तो’ ताडी विक्री दुकानाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडीच्या नशेत दिला आहे की संबंधिताने राज्य उत्पादन शुल्क विभाग यावल ( भुसावळ ) व जळगाव यांची  फसवणूक आणि आर्थिक संगनमत  करून ‘ताडी’ दुकानाचा परवाना मिळविला आहे का ? असा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला असल्याने संपूर्ण यावल शहरात चर्चेला उधाण आले आहे.       श्रीधर के.सुर्वे जन्म माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्याकडील दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी मिळालेले पत्र व त्यासोबतची मिळालेली माहिती प्रत्यक्ष बघितली असता यावल येथील मेरगु नारायण गौंड रा.करीमनगर,नमापूर. (आंध्र…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी वसंत ऋतूची चाहूल लागताच डोंगर ,वन तसेच सोयगाव-बनोटी रस्तावरील बहरलेले पळसाची झाडे सर्वांची लक्ष वेधून घेतात ,सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात तर बहुगुणी दुर्मिळ पिवळा पळस बहरला आहे ,हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून औषधीसाठी या पिवळ्या फुलांचा उपयोग होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाल केसरी पळस फुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो औषधीसाठी ही या फुलांचा उपयोग आहे असे तज्ञ सांगतात पिवळ्या अळसाबद्दल काही अंधश्रद्धा देखील प्रचलित आहेत गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा भावात झालेल्या मोठ्या घसरणीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी गळ्यात कांदा माळ घालून व डोक्यावर कांदा भरलेली टोपली घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेधार्थ आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाकडे बघतो एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च करून शेतकरी .वर्षभराचे आर्थिक नियोजन करतात मात्र सद्या कांद्याला २ ते ५ रुपये असा कवडीमोल भाव मिळत असून उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने कांदा…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी येथील आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांची अटक म्हणजे भाजपने सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.     सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर अशीच गळचेपी सुरू राहणार असली तर देशभर इंकलाब करण्याचा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीने  देण्यात आला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाई करत त्यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्या आधी तब्बल आठ तास मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ही…

Read More