पिंपळे येथे 76 मेंढ्या दगावल्या  ; तहसीलदारांचा  जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

0
1

साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळे येथे बुरशीजन्य गहु खाल्ल्याने ७६ मेंढ्या दगावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान १४८ मेंढ्या अत्यवस्थ असुन या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेउन मेंढी मालकांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या घटनेचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असुन पशुधनाचे नुकसान झाल्याप्रकरणी भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

पिंपळे येथे झालेल्या घटनास्थळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. परमोद सोनवणे, कृषी पर्यवेक्षक श्री. देसले, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून प्राथमिक अहवाल तयार केला. यात मौजे पिंपळे खुर्द येथील दिलीप मधुकर माळी यांच्या शेतात मयत झालेल्या मेंढ्यांबाबत गोरख भावडू ठेलारी यांच्या मालकीच्या 17 मेंढी मयत व 20 अंत्यवस्थेत, गोविंद भावडू ठेलारी यांच्या मालकीचे 4 मेंढी मयत व 15 मेंढ्या अंत्यवस्थेत, लखन धुला ठेलारी यांच्या मालकीचे 22 मेंढ्या मयत व 25 मेंढ्या अंत्यवस्थेत, नाना शिवराम ठेलारी यांच्या मालकीची 1 मेंढी मयत व 18 मेंढ्या अंत्यवस्थेत आहेत. तर मौजे पिंपळे बुद्रुक येथील फिरोज अब्बा मिया पटेल यांच्या शेतात मयत झालेल्य मेंढ्यांबाबतमाहिती अशी की, सकाराम धुला ठेलारी यांच्या मालकीचे 12 मेंढ्या मयत व 32 मेंढ्या अंत्यवस्थेत, जगन गंगाराम ठेलारी यांच्या मालकीच्या 09 मेंढ्या मयत व 18 मेंढ्या अंत्यवस्थेत, तात्या गंगाराम ठेलारी यांच्या मालकीचे 11 मेंढ्या मयत व 20 मेंढ्या अंत्यवस्थेत, मौजे पिंपळे बुद्रुक व पिंपळे खुर्द येथील एकूण 76 मयत मेंढ्या व अत्यवस्थेत / आजारी एकूण 148 आहेत याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे व त्यांचे पथक उपचार करीत आहेत. काही मयत मेंढ्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पी.एम केलेअसून उर्वरित चे पी. एम सुरु होते. मौजे पिंपळे बु. आणि पिंपळे खु. येथील मयत व अत्यावस्थ असलेल्या मेंढ्या बाबतचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल धरणगावचे प्रभारी तहसीलदार लक्षमण सातपुते यांनी जिल्हाधिकारी टंचाई शाखा यांच्याकडे सादर केला आहे.

याबाबतचा सदर मेंढ्या या अवकाळी पावसाने गव्हावर बुरशीजन्य गहू खाल्याने विषबाधा झाली असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले असल्याचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार सातपुते यांच्याशी दूर ध्वनी द्वारे संपर्क साधून माहिती घेतली. तर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत मेंढपाळ बांधवांचे सांत्वन करून प्रशासनामार्फत योग्य ती मदत करण्याचे आश्वासित केले. यावेळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, कृषी पर्यवेक्षक किरण देसले , यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून अत्यावस्थेत असणाऱ्या मेंध्यावर उपचार सुरु केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील , पिंगळेबु. चे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, धरणगाव शहरातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बाळू जाधव, रवी महाजन, राजू सुकलाल महाजन, हेमंत चौधरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here