Author: Saimat

MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नुकतीच भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या संस्ठेद्वारे संबंधित सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आले. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://www.cricketmaharashtra.com/ या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंबंधित माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मुख्य संचालन अधिकारी (Chief Operating Officer – COO) या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २३ मार्च २०२३ ला सुरुवात झाली आहे. तर १० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवार संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तसेच ते applycoomca@yahoo.com या…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर दि.२१रोजी सांयकाळी३ते४वाजेच्या सुमारास शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण  खून  प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या  जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला आज दि.२३ रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६ पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.      दारूच्या नशेत दि.२१रोजी शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ(वय३७) याची दगडाने ठेचून निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती .  या हत्येप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय४१)  यांस शिंगायत येथून  ताब्यात घेऊन पहुर पोलिसांच्या ताब्यात…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी एस टी महामंडळ जळगाव विभाग नियंत्रक यांच्या कार्यक्षेत्रातील यावल एसटी आगारातील भूमिगत डिझेल टाकीतील हजारो लिटर डिझेल स्टॉक रजिस्टरला कमी पडल्याने जमिनीतील डिझेल टाकीला गळती लागून जमिनीत झिरपले किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी हजारो लिटर डिझेलची विल्हेवाट लावली आहे किंवा कसे? याची चौकशी जळगाव विभाग नियंत्रक स्तरावरून आणि डिझेल कंपनी कडून आज गुरुवार दि. 23 मार्च 2023 पासून सुरू झाली याबाबत यावल आगार प्रमुख म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांनी दुजोरा दिला आहे तरी यावल आगारातील डिझेल पंपाला सील ठोकण्यात आले असून पुढील चौकशी वरिष्ठ स्तरावरून सुरू झाल्याने लवकरच वस्तुस्थिती समोर येईल असे त्यांनी सांगितले.…

Read More

साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे येथे बुरशीजन्य गहु खाल्ल्याने ७६ मेंढ्या दगावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान १४८ मेंढ्या अत्यवस्थ असुन या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेउन मेंढी मालकांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या घटनेचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असुन पशुधनाचे नुकसान झाल्याप्रकरणी भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. पिंपळे येथे झालेल्या घटनास्थळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. परमोद सोनवणे, कृषी पर्यवेक्षक श्री. देसले, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून प्राथमिक अहवाल तयार केला. यात मौजे पिंपळे खुर्द येथील दिलीप मधुकर माळी यांच्या…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझरटाऊनशिप :  शितो रियू कराटे डो क्लब मार्शल आर्ट नाशिक यांच्या तर्फे  घेण्यात आलेल्या खुल्या  राज्यस्तरीय  कराटे चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत  एच.ए.ई.डब्ल्यू .आर.सी.संस्था संचलित ओझरटाऊनशिप मधील  कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असुन 20 विद्यार्थ्यांनी सुवर्ण , 4 विद्यार्थ्यांनी सिल्व्हर व 4 विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकावित स्पर्धेतील त्रुतीय क्रमांकाचे सांघीक पारितोषिक ही पटकाविले आहे.        विभागीय संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी नाशिक येथे वयोगटानुसार झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत  राज्यातील विविध ठिकाणांहून  आलेल्या 430 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये स्कुल आँफ ओरिएंटल मार्शल आर्ट ओझरटाऊनशिप कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला  त्यामध्ये   मुकुंदचव्हाण, श्रीरंग…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल शहरासह यावल मंडळात खाजगी व्यावसायिक तसेच शासकीय स्तरावरील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटसह बाधकाम व्यवसायाची अनेक कामे सुरू आहेत या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी वाळू प्रत्यक्ष दिसून येत असल्याने कोण म्हणतं यावल मंडळात अवैध वाळू वाहतूक आणि विक्री बंद आहे…? अशी चर्चा परिसरात रंगली आहे. यावल एसटी स्टँड आवारात श्री काळभैरव यांच्या साक्षीने मंदिराच्या समोर सार्वजनिक वापराच्या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून वाळू साठा प्रत्यक्ष सर्वांसमक्ष पडून आहे, याचप्रमाणे यावल शहरासह यावल मंडळात अनेक ठिकाणी सार्वजनिक व्यवसायिक आणि शासकीय स्तरावर अनेक बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी सर्रासपणे यावल परिसरातील नदी नाल्यांमधील तसेच तापी, गिरणा नदीतील वाळू डपर,…

Read More

????️ हिंदू नववर्ष तथा आपला पहिला सण शालिवाहन शके 1945 चैत्र शु.1 बुधवार दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडवा… ????????चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तराचा आरंभ होतो, प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करावे, निंब पत्राचे भक्षण,वर्ष फळाचे श्रवण, नवरात्र ला आरंभ या दिवशी तैलभ्यंग करावे. ???? 4 महिन्यापर्यंत जलदान करावे,पाणपोई सुरु करण्यास असमर्थ असेल त्याने उदकाने कुंभ भरून वेदोक्त ब्राम्हणाच्या घरी द्यावा. ????गुढीपाडवा ला करावयाचे उपाय… ????️ग्रंथात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा ज्या वारी आला त्या वारा संबंधित देवतेचे पूजन करावे म्हणजे संपूर्ण वर्ष चांगले जाते. म्हणजे 22 तारखे ला बुधवार ???? बुधवार हा विष्णू देवता.. विठ्ठल रुखमाई… श्री कृष्ण यांचा आवडता वार……

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी फैजपूर शहरात यावल रावेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या आश्रय फाऊंडेशन कडून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांचा सन्मान हा स्तुत्य कार्यक्रम फैजपूर शहरातील शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ संपन्न झाला.या कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील १५ महिला व तीन महिला संघांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिन सेवा पंधरवाडा निमित्त दि.19 रविवारी रोजी फैजपूर शहरात हा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यधापिका शुभांगी महाजन होत्या तर प्रमुख उपस्थितीत आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ.विलास पाटील,सचिव डॉ. पराग पाटील,डॉ.राजेश चौधरी,डॉ.दिलीप भटकर,डॉ नितीन महाजन,डॉ.भरत महाजन,डॉ.प्रशांत जावळे, डॉ.ताराचंद सावळे,डॉ.…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय कालिदास विठाेबा नेमाडे यांच्या स्मरणार्थ बहुभाषिक कालिदास काव्यमहाेत्सव यंदा आयाेजित केला आहे. रिंगराेडवरील संताेषी माता हाॅल येथे रविवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजेपासून हा महाेत्सव सुरू हाेईल. काव्यमहाेत्सवाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार’ जाहीर झालेले डाॅ. मधू खराटे भूषवतील. निमंत्रित कवींमध्ये प्रा. डाॅ. जे. पी. सुचिक, हामीद भुसावली, हरीषकुमार नागदेव, प्रा. डाॅ. रघुनाथ कश्यप, प्रा. डाॅ. सुधा खराटे, रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे, प्रा. डाॅ. सुरेश कुसुंबीवाल, हारुन उस्मानी, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, संध्या भाेळे अशा १२ जणांचा समावेश आहे. निवेदकाची भूमिका संत गाडगेबाबा…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी  बोदवड शहरातील माळीवाडा भागात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना प्रकाश माळी वय ३४ याने त्याच्या विरुद्ध पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग ठेऊन योगेश सुभाष माळी वय ३६ यांचे घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली आणि त्याच वेळी रस्त्याने हिरो होंडा एच एफ डीलक्स क्र.एम एच २० एफ के ४२६४ मोटरसायकलने जाणारे अनिकेत श्रावण उमाळे, गणेश रामा देवरे रा रेवती यांना अडवले व दगडाने मारण्याचा धाक दाखवून पळवून लावले व त्या मोटरसायकलची पेट्रोलनळी काढून त्यातील पेट्रोल बाटलीत घेऊन योगेश माळी यांचे घरासमोरील चारा कुट्टी भरलेले कुट्टीचे शेड पेटवून दिले व उरलेले पेट्रोल मोटारसायकलवर टाकुन पेटवून दिली .या माथेफिरूने योगेश माळी…

Read More