साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा,जळगाव जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यातील कर्तृत्वान व समाजात नावीन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना दि.२६ रोजी स्व.सुषमाजी स्वराज अवार्ड देऊन गौरविण्यात आले यात कजगाव च्या पुष्पलता ललवाणी व भडगाव च्या तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे यांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले .
जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी संपुर्ण जगात साजरा करण्यात आला, त्या निम्मीताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे संपूर्ण देशात महिला दिनानिम्मीत सुषमा स्वराज अवार्ड अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा श्रीमती. रेखाताई पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यातील सामाजिक धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा सांस्कृतिक, शेती, व्यापार, उद्योग शासन, प्रशासनात विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या ३० महिलांची सुषमा स्वराज अवार्डसाठी निवड़ केली.
यात भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पुष्पलता प्रमोद ललवाणी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता आकडे यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवे बद्दल सुषमा स्वराज अवार्ड आ.सुरेश भोळे यांचे हस्ते देण्यात आला सुषमा स्वराज अवार्ड वितरण आ. सुरेश दामु भोळे(राजुमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २६ रोजी सकाळी जी.एम फाउंडेशन जळगाव येथे आयोजीत करण्यात आले होते प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सुषमा स्वराज अवार्ड देऊन गौरविण्यात आले प्रसंगी ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील सरचिटणीस संगीता पाटील,कविता देशमुख, रंजना धुमाळ,रेखा बोंडे,जयश्री चौधरी भडगाव तालुका महिला अध्यक्षा नुतन पाटील,उपाध्यक्षा प्रतिभा साठे सह जिल्हाभरातून भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.