साईमत लाईव्ह आमोदा प्रतिनिधी
आमोदा येथील श्रीराम मंदिरामध्ये सात दिवस झाले ध्वजारोहण व हनुमान ध्वजपूजन कलश यात्रा दिंडी सोहळा रामचरितमानस पारायण व नवान पारायण महंत कन्हैया दाजी महाराज यांच्या अमृतवाणीतून झाले आज रात्री राम जन्मोत्सवानिमित्त भजन व श्रीराम जन्माचे ह भ प मनोज महाराज दुसखेडा यांचे जाहीर कीर्तन होणार आहेतसेच दुपारी महाप्रसाद अन्नदाते कै आप्पासाहेब घनश्याम काशीराम पाटील यांच्याकडून होणार आहे.
संपूर्ण भगवान श्रीराम मंदिर हे फुलांनी व लाइटिंग ने सजवलेले आहे. अशी आख्यायिका आहे की सदरहून श्रीराम मंदिरमंदिराची स्थापनास्वामी शंकर पुरी महाराज आत्मचरित्र कथा गावातील ज्येष्ठ नागरिकयांच्या सहवासातून मिळालेल्या माहितीनुसारओम श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक सचिन आनंद व ब्रह्मकालीन साधू शंकरपुरी महाराज हे काशी येथून भारत भ्रमण करीत असताना आमोदे गावात फिरत फिरत आले व आपल्या मंदिराचे आग्नेय बाजूस मोठा पिंपळाच्या वृक्षाखालीत्यांना साक्षात्कार झालाव त्यांनी तेथेच आपले आसन मांडले व कित्येक दिवस गावातून आपला उदरनिर्वाह गावात मागून मागून करीत होतेत्यानंतर गावातील नागरिक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले व उत्तम भविष्यकार व उत्तम ज्योतिषी ते होते तसेच त्यांनी कुंडली शक्ती जागृत होती त्यामुळे गावातील जुन्या सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षाच्या आसपास लोकांनी त्यांच्याकडून गुरूदक्षिणा घेतली आणि गावातील लोकांना एकत्र करून आपल्या गावात मंदिर नाही तर तुम्ही या ठिकाणी श्रीराम मंदिर निर्माण करा असा उपदेश दिला व त्यावेळी जेष्ठ नागरिक भुरा मुरा पाटील इच्छाराम तुकाराम महाजन सोनू कौतिक पाटील महारु चौधरी अशा बऱ्याचशा लोकांनी मंदिर उभारणीसाठी अतोनात प्रयत्न व श्रमदान करून भव्य असे श्रीराम मंदिर निर्माण केले त्यानंतर त्यांनी काही कारणास्तव आमोदा गावातून त्या करून तेथून निघून गेले काही दिवसानंतर त्यांचा शोध खंडवा येथे लागला व त्यांनी तेथे समाधी घेतली असे समजले जाते तेव्हा ग्रामस्थ तेथे जाऊन त्यांच्या पादुका आणून श्रीराम मंदिरात एका छोट्या मंदिरात स्थापना केली यानंतर या ठिकाणी जानकी बैरागी महाराज आले त्यांनी बरेच दिवस पूजा आजच्या केलीत्यानंतर महंत अमरदासजी महाराज अयोध्या येथून आले त्यांनी सुद्धा काही वर्ष मंदिरात पूजा आरती केली त्यावेळी मोर नदीत बारा महिने वाहत होती नंतर त्यांनी गावचा त्याग करून जवळ असलेल्या सुने सावखेडा येथे जाऊन हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार केला त्यानंतर गोविंदास महाराज महंत मुकुंद दास वैष्णव तसेच उदय महाराज जोशी फैजपूर यांनी बऱ्याच वर्ष मंदिरात पूजा अर्चा व आरती केली त्यानंतर आजपर्यंत महंत कन्हैया दास महाराज हेच पुजारी म्हणून कार्यरत आहेत.
२०११ साली गावातील सर्व जेष्ठ नागरिक व युवक मंडळींनी च्या सहकार्याने सर्व मंदिराचे नितीन नूतनीकरण कार्य हाती नवीन मूर्तीची स्थापना केली व शताब्दी महोत्सव साजरा केला आता नवीन लेवा श्रीराम मंदिर ट्रस्ट मंडळ चेअरमन मोहन पुरुषोत्तम लोखंडे व्हाईस चेअरमन उमेश प्रभाकर पाटील चिटणीस अमृत महाजन खजिनदार जनार्दन धर्मा तळेले सदस्य महेंद्र प्रल्हाद सरोदे पाटील धनराज शेनपुडू चौधरी हे पाहत आहे साधारण गावातील महाप्रसाद व सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा असे विश्वस्त मंडळ व सर्व धर्मीय ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे असे लेवा श्रीराम ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांनी आव्हान केले आहे