Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील थोर सन्मित्र मंगल कार्यालयात रविवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीसह निकाल लागणार होता. या निकालाने इंडिया गॅरेज परिसर गजबजून गेला होता.या परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने असल्याने हा परिसर प्रभावित झाला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय झाली होती तर परिसरातील नागरिकांनाही सुटीच्या रविवारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. निकालानंतर फटाके व ढोल ताशांमुळे परिसर प्रभावीत झाला तर विविध हॉस्पिटल्समुळे संवेदनशील असलेल्या या भागात निकाल न ठेवता अन्यत्र ठेवायला हवा होता, असे मत काही वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. शहरातील इंडिया गॅरेज ते शिंपी बोर्डींग हा रस्ता जिल्हा पेठ परिसरातील मुख्य रस्ता आहे.परिसरातील सिंधी कॉलनी रोड,…

Read More

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी शिर्डीच्या साई बाबा मंदिराला  देण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या CIFS सुरक्षेला विरोध करत येत्या 1 मे पासून शिर्डी गाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. मात्र या बंद मध्ये साई बाबा मंदिर सहभागी होणारं नाही त्यामुळे भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे. साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंदिर प्रशासनाला अनेक वेळा मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 2018 साली सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानूसार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील मंदिराला केंद्रीय CIFS सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. तर न्यायालयाने याबाबत मंदिर प्रशासनाला देखील आपले म्हणणे मागवले आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाने…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून समोर येत होत्या. या सर्व घटनाक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावण्यात आले. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सामान्यांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासनात पारदर्शकपणा व गतिमानता आणण्यासाठी सोयगाव प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसिलदार रमेश जसवंत यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, नगरपंचायत अध्यक्षा आशाबी तडवी, शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, राजू दुतोंडे, कदीर शहा, सर्व सन्माननीय नगरसेवक, पपींद्रपालसिंग वायटी, दिलीप देसाई, पत्रकार मित्र व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत(BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी शासन स्तरावरील शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदानाची कोट्यवधी रु ची रक्कम तहसील कडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या वर  ही रक्कम तहसील च्या खात्यावर परत आल्याचा प्रकार गुरुवारी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे बँक खातेच आधारशी संलग्न केले नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे तहसीलदार रमेश जसवंत यांनी गुरुवारी थेट बॅंकांना पत्र काढून शेतकऱ्यांची बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहे.      शासनाकडून यापूर्वी विविध योजनांची अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असे परंतु आता शासनाचे सर्व प्रकारचे शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. परंतु सोयगाव तालुक्यातील…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक बघायला मिळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. कारण अजित पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात किंवा भाजप-शिवसेना युती सरकारला देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. जर असे घडले तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४०…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी येथे जयप्रकाश नारायण सर्वांगीण विकास संस्था, भुसावळ नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कस्तुरबा गांधी यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचे प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शन दि.14 आणि 15 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वे उत्तर बाजू केला साइडिंग भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मिलिंद पाटील मंडल साचिव(ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन), समाधान पाटील अध्यक्ष अतिरिक्त मंडळ (ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन), सुधाकर बडगुजर राज्य उपाध्यक्ष (सत्यशोधक…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात अशी चर्चा सुरू होती. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अजित पवार जेव्हा अचानक गायब होतात, तेव्हा काही तरी शिजतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले होते. त्यावेळी त्यांनी पित्ताचा त्रास असल्यामुळे आपण आराम केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुण्यातील दोन कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केला. त्यामुळे या कार्यक्रमांना पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना जावे…

Read More

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चॅनल मॅनेजर आणि सपोर्ट ऑफिसर पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवार 30 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी SBI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी 1 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (SBI Channel Manager and Support Officer Recruitment of 1031 posts apply online) कोणत्या पदांसाठी भरती केली जाईल अधिकृत माहितीनुसार, या प्रक्रियेद्वारे बँक ऑफ इंडियामध्ये चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर 821 पदे, चॅनल मॅनेजर सुपरवायझर 172 पदे आणि सपोर्ट ऑफिसरच्या 38 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांची भरती मुलाखतीच्या आधारे…

Read More