निलंबनाचा आदेश मिळताच नांदुरा अर्बन बँकेच्या सभेतून ठराव बुक घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे यांचा पोबारा सहकार क्षेत्रात एकच खळबळ

0
8
साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी
नांदुरा अर्बन बँक  सद्यस्थितीत या ना त्या कारणाने चर्चेत असून आज बँकेत पार पडलेल्या कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीच्या बैठकीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निलंबनाचा विषय येताच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोसेडींग घेऊन पळत निघाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की २९ मार्च रोजी बँकेच्या मुख्यालयात कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीची बैठक बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव यांच्या अध्यक्षते खाली सुरु होती. या बैठकी दरम्यान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रप्रसाद रामकेवल पांडे यांचे सर्वानुमते निलंबन करण्याचे आदेश काढण्याचा विषय येताच  त्यांनी सदर कर्मचारी समितीचे प्रोसेडींग सभा चालू असतांना सदस्यांच्या सह्या न घेताच सभेमधून हिसकावून पळवून घेऊन गेले सदर प्रोसेडींग हे बँकेच्या प्रशासकीय कामकाजाचे असून यामुळे बँकेच्या प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून ही बाब संस्थेच्या कामकाजाच्या विरुद्ध असल्याने नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव यांनी नांदुरा पोलीसांत राजेंद्र पांडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज करीत त्यांच्यावर आवश्यक कलमानुसार कार्यवाही करावी असे नमूद केले आहे,या अगोदर या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला २१मार्च रोजी बँकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती हे विशेष.
निलंबनाचा आदेश घेताच राजेंद्र पांडे ठराव बुक घेऊन बँकेतून पळाले – अध्यक्षअरुण पांडव
आज नांदुरा अर्बन बँकेच्या सभेत कर्मचारी समितीची सभा सुरू होती. या सभेत राजेंद्र पांडे यांच्या निलंबनाचा ठराव पास करण्यात आला निलंबनाचा आदेश राजेंद्र पांडे यांना देण्यात आला त्यांनी निलंबन आदेश घेतला परंतु ज्यां कर्मचारी समितिच्या ठराव बुकावर निलंबन आदेशाचा ठराव लिहायचा होता ते ठराव बुक घेऊन निलंबित कर्मचारी बँकेतून पळून गेला या बाबत नांदुरा पोलीस स्टेशनला आज बुधवार 29 रोजी सविस्तर तक्रार देऊन राजेंद्र पांडे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आल्याची प्रतिक्रिया नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here