Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी  यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतकडून ठराव झालेला नसताना 70/30 योजनेतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मार्च अखेर पूर्ण करून घेण्याचा प्रताप सुरू असल्याने या बांधकामाच्या प्रतापाकडे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह बांधकाम विभाग उप अभियंता यांच्याकडून कार्यालयीन कामकाज कोणत्या पद्धतीने बघितलं जात आहे.  आणि कार्यारंभ आदेश कोणत्या नियमाच्या आधारे काढला याबाबत तसेच यावल तालुक्यात पंचायत समिती स्तरापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याशी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमता बाबत यावल व रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.         कोसगाव येथील शौचालयाचे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे अशी कोसगाव ग्रामपंचायत उपसरपंच व  काही सदस्यांनी…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी   १० वी चे बोर्डाचे पेपर संपताच विद्यार्थ्यांनी हॉटेल मध्ये पार्टी न करता निफाड येथील मानव बिबट सहजीवन केंद्राला भेट देत आपली सुट्टी साजरी केली.        १० वी चे वर्ष म्हणजे आयुष्याच्या शिक्षणाचा एक टप्पा पुर्ण होतो. हे पुर्ण वर्ष विद्यार्थ्यांकडे पालक व शिक्षक जास्त लक्ष देऊन अभ्यास करून घेत असतात, त्यामुळे १० वीचे पेपर संपल्यावर दुसऱ्या दिवशी विदयार्थी  मोकळेपणाने खेळत आपला आनंद साजरा करतात मात्र चितेगांव तालुका निफाड येथील विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत  श्री कृष्ण क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मानव बिबट सहजवीन केंद्र येथे भेट दिली. नाशिक पुर्व वनविभाग व वन्यजीव संरक्षण…

Read More

कोकणात म्हणजेच, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड नावाचा किल्ला आढळल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी याबाबतची माहिती उजेडात आणली. जोशी आणि परांजपे यांनी इतिहासातील संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडच्या पूर्वेला समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर उंचीवर हा लहान किल्ला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडसाठी हा जोडकिल्ला असावा, असा अंदाज देखील अभ्यासकांनी वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच ‘रामगड’ नावाचा किल्ला आहे. आता दापोली तालुक्यात याच ‘रामगड’ नावाचा किल्ला आढळल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा आहे. दापोली तालुक्यातील…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात दुचाकीच्या वादातून चौघांनी चॉप भोसकून खून केल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली होती. अवघ्या काही तासातच खून करणाऱ्या चौघांना शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. चौघांवर पहाटे चार वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान हटकर हा आई सरलाबाई यांच्यासोबत हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होता. आई धुणीभांडीचे काम करतात तर सोपान हा मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोपानने दुचाकी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  मुंबईत पहाटे साकीनाका परिसरात मोठी आग लागली. या आगीत हार्डवेअरचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं.अचनाक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली. मुंबईत पहाटे ३ वाजता साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली होती. सकाळच्या सुमारास आग नियंत्रणात आली होती. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले आहेत.…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लक्षात घेता यावल तालुक्यात काँग्रेसला अंजाळे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खिंडार पडले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तालुक्यातील भालोद येथे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात भारतीय जनता पार्टी तर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्यात आली.मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायत उपसरपंच व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपक नरोत्तम चौधरी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शुभम पंडित चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचा…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगावसह तालुक्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचे ६३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून अद्यापही सुट्टीच्या दिवशीही महसूल कृषीच्या संयुक्त पथकाची मोहीम सुरू असल्याचे महसूल विभागाने सांगितले दरम्यान सोयगाव तालुक्यात तीन दिवसात तब्बल दोन हजार सहाशे ७६ हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये अवकाळीच्या नुकसानी मध्ये पाच हजार सातशे अंशी शेतकऱ्यांची बाधित म्हणून नोंद करण्यात आली आहे शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस ही पंचनामा मोहीम सुरू होती सोमवारी दि.२७ ते बुधवारी दि.२९ तीन दिवस ऑफ लाईन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येईल त्यामुळे पुन्हा बाधित क्षेत्रासह शेतकरी संख्येत वाढ होईल सोयगाव तालुक्यात अवकाळीच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात ६३ टक्के…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा व शेतकरी सहल शनिवारी तिडका शिवारात धडकली होती यावेळी खरपुडी केवीके जालना येथील शास्त्रज्ञ अधिकारी यांचाही शेतकरी अभ्यास दौरा व सहलमध्ये समावेश होता या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तिडका येथील ईश्वर सपकाळ यांच्या शेताला भेट दिली. ईश्वर सपकाळ यांच्या शेतातील सुंदर पीक रचना. मका, बाजरी, सूर्यफूल, हळद, कांदा सर्वच उत्कृष्ट. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा,पाहून शेतकरी भारावून गेले होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि चिकित्सक वृत्ती यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळे आहात. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा कौतुकास पात्र आहे.भेटीत आपण दिलेला वेळ, माहिती, प्रेम आणि पाहुणचार याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले…दरम्यान अभ्यास…

Read More

 साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव        भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा,जळगाव जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यातील कर्तृत्वान व समाजात नावीन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना दि.२६ रोजी स्व.सुषमाजी स्वराज अवार्ड देऊन गौरविण्यात आले यात कजगाव च्या पुष्पलता ललवाणी व भडगाव च्या तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे यांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले . जागतिक महिला दिन ८ मार्च  रोजी संपुर्ण जगात साजरा करण्यात आला, त्या निम्मीताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे संपूर्ण देशात महिला दिनानिम्मीत सुषमा स्वराज अवार्ड अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी महाराष्ट्रातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर संबंधित अधिकारी,मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत दिले.मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी विश्वस्तांची सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच मुख्यमंत्र्यांनी मंदिर विश्वस्तांच्या मागण्यांची गंभीरपणे नोंद घेतली, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी जळगाव येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले…

Read More