सारस्वत बँकेत १५० पदांसाठी होणार भरती, ८ एप्रिलपर्यंत करा अर्ज

0
1

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी ( (Marketing And Operations) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२३ आहे. सारस्वत बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार http://www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सारस्वत बँक भरतीचे रिक्त पदासाठी माहिती:

सारस्वत बँकेच्या भरती मोहिमेत एकूण १५० रिक्त जागांवर कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्ग पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक तपशीलांसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक येथे आहे

सारस्वत बँक भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा:

  • बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.saraswatbank.com वर जा.
  • बँकेच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या करिअरवर क्लिक करा.
  • अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा आणि भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here