नवीन SIM Card Rules लागू, जाणून घ्या अन्यथा २ वर्षासाठी मोबाइल नंबर होईल ब्लॉक

0
1

केंद्र सरकारने स्पॅम आणि फ्रॉड कॉलला रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. सरकारकडून फ्रॉड आणि स्पॅम कॉलने यूजर्सला दिलासा देण्यासाठी प्लान बनवायचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी ट्रायकडून २३ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वसंमतीने एक प्लान बनवला होता. याअंतर्गत कोणताही यूजर आपल्या पर्सनल मोबाइल नंबरचा वापर प्रमोशन किंवा स्पॅम कॉलसाठी करीत असेल तर मोबाइल नंबरला २ वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच त्या पत्त्यावर नवीन सिम कार्ड जारी करण्यात येणार नाही.

१० डिजिटचा मोबाइल नंबरसाठी नवीन प्लान
याअंतर्गत ट्रायने प्रमोशन कॉलसाठी वेगळे १० डिजिटचा मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत प्रमोशन आणि स्पॅम कॉलला ओळखता आले पाहिजे. सोबत मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने स्पॅम आणि फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठी टेक्नोलॉजी डेव्हलप करण्याचे निर्देश दिले आहेत.

जारी होतील नवीन मोबाइल नंबर
ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना ७ वेगवेगळ्या कॅटेगरी अंतर्गत १० डिजिटचे मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे प्रमोशन आणि स्पॅम कॉलला ओळखता येवू शकते. यासाठी ट्रायने ७ कॅटेगरी बनवली आहे. या सर्व कॅटेगरी अंतर्गत वेगवेगळे मोबाइल नंबर जारी केले जातील. यावरून यूजर्सला फ्रॉड आणि स्पॅम कॉल ओळखता येवू शकतील. त्यानंतर त्याला ब्लॉक केले जावू शकते. याशिवाय, डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडीला चांगले बनवण्यासाठी जोर दिला जावू शकतो.
ही असेल नवीन मोबाइल कॅटेगरी
बँकिंग, इन्श्यूरेन्स, फायनान्स प्रोडक्ट्स, क्रेडिट कार्ड
शिक्षण
आरोग्य
वस्तू आणि ऑटोमोबाइल
कम्यूनिकेशन, प्रसारण, मनोरंजन, आयटी
पर्यटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here