साईमत लाईव्ह आमोदा प्रतिनिधी आमोदा येथील श्रीराम मंदिरामध्ये सात दिवस झाले ध्वजारोहण व हनुमान ध्वजपूजन कलश यात्रा दिंडी सोहळा रामचरितमानस पारायण व नवान पारायण महंत कन्हैया दाजी महाराज यांच्या अमृतवाणीतून झाले आज रात्री राम जन्मोत्सवानिमित्त भजन व श्रीराम जन्माचे ह भ प मनोज महाराज दुसखेडा यांचे जाहीर कीर्तन होणार आहेतसेच दुपारी महाप्रसाद अन्नदाते कै आप्पासाहेब घनश्याम काशीराम पाटील यांच्याकडून होणार आहे. संपूर्ण भगवान श्रीराम मंदिर हे फुलांनी व लाइटिंग ने सजवलेले आहे. अशी आख्यायिका आहे की सदरहून श्रीराम मंदिरमंदिराची स्थापनास्वामी शंकर पुरी महाराज आत्मचरित्र कथा गावातील ज्येष्ठ नागरिकयांच्या सहवासातून मिळालेल्या माहितीनुसारओम श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक सचिन आनंद व ब्रह्मकालीन साधू…
Author: Saimat
एअरटेलकडून 5G सर्विस ला ५०० हून जास्त शहरात रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, एअरटेलकडून सद्या ५जी रिचार्ज प्लानला लाँच करण्यात आले नाही. परंतु, असे नाही की, तुम्ही फ्री मध्ये 5G सर्विसचा वापर करू शकाल. जर तुम्ही एअरटेल ५जी सर्विसचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज करावा लागेल. खरं म्हणजे कंपनीने स्पष्ट केले आहे की, २४९ रुपयांपेक्षा कमी मंथली रिचार्ज प्लानमध्ये ५जी सर्विसचा वापर करता येवू शकणार नाही. भारतात जिओ आणि एअरटेल अशा दोन कंपन्या आपल्या यूजर्सला ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी देशातील अनेक प्रमुख शहरात आपली सेवा रोलआउट केली आहे. एअरटेल देत…
केंद्र सरकारने स्पॅम आणि फ्रॉड कॉलला रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. सरकारकडून फ्रॉड आणि स्पॅम कॉलने यूजर्सला दिलासा देण्यासाठी प्लान बनवायचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी ट्रायकडून २३ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वसंमतीने एक प्लान बनवला होता. याअंतर्गत कोणताही यूजर आपल्या पर्सनल मोबाइल नंबरचा वापर प्रमोशन किंवा स्पॅम कॉलसाठी करीत असेल तर मोबाइल नंबरला २ वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच त्या पत्त्यावर नवीन सिम कार्ड जारी करण्यात येणार नाही. १० डिजिटचा मोबाइल नंबरसाठी नवीन प्लान याअंतर्गत ट्रायने प्रमोशन कॉलसाठी वेगळे १० डिजिटचा मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत प्रमोशन आणि स्पॅम कॉलला ओळखता आले पाहिजे.…
Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी ( (Marketing And Operations) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२३ आहे. सारस्वत बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार http://www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सारस्वत बँक भरतीचे रिक्त पदासाठी माहिती: सारस्वत बँकेच्या भरती मोहिमेत एकूण १५० रिक्त जागांवर कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्ग पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक तपशीलांसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा. अर्ज करण्यासाठी थेट लिंक…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यातील भाजपच्या जुन्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना आज सकाळी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. १९७३ ला टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. त्यानंतर त्यांना पुणे…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतकडून ठराव झालेला नसताना 70/30 योजनेतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मार्च अखेर पूर्ण करून घेण्याचा प्रताप सुरू असल्याने या बांधकामाच्या प्रतापाकडे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह बांधकाम विभाग उप अभियंता यांच्याकडून कार्यालयीन कामकाज कोणत्या पद्धतीने बघितलं जात आहे. आणि कार्यारंभ आदेश कोणत्या नियमाच्या आधारे काढला याबाबत तसेच यावल तालुक्यात पंचायत समिती स्तरापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याशी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमता बाबत यावल व रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोसगाव येथील शौचालयाचे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे अशी कोसगाव ग्रामपंचायत उपसरपंच व काही सदस्यांनी…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी १० वी चे बोर्डाचे पेपर संपताच विद्यार्थ्यांनी हॉटेल मध्ये पार्टी न करता निफाड येथील मानव बिबट सहजीवन केंद्राला भेट देत आपली सुट्टी साजरी केली. १० वी चे वर्ष म्हणजे आयुष्याच्या शिक्षणाचा एक टप्पा पुर्ण होतो. हे पुर्ण वर्ष विद्यार्थ्यांकडे पालक व शिक्षक जास्त लक्ष देऊन अभ्यास करून घेत असतात, त्यामुळे १० वीचे पेपर संपल्यावर दुसऱ्या दिवशी विदयार्थी मोकळेपणाने खेळत आपला आनंद साजरा करतात मात्र चितेगांव तालुका निफाड येथील विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत श्री कृष्ण क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मानव बिबट सहजवीन केंद्र येथे भेट दिली. नाशिक पुर्व वनविभाग व वन्यजीव संरक्षण…
कोकणात म्हणजेच, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड नावाचा किल्ला आढळल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी याबाबतची माहिती उजेडात आणली. जोशी आणि परांजपे यांनी इतिहासातील संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडच्या पूर्वेला समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर उंचीवर हा लहान किल्ला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडसाठी हा जोडकिल्ला असावा, असा अंदाज देखील अभ्यासकांनी वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच ‘रामगड’ नावाचा किल्ला आहे. आता दापोली तालुक्यात याच ‘रामगड’ नावाचा किल्ला आढळल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा आहे. दापोली तालुक्यातील…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात दुचाकीच्या वादातून चौघांनी चॉप भोसकून खून केल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली होती. अवघ्या काही तासातच खून करणाऱ्या चौघांना शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. चौघांवर पहाटे चार वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान हटकर हा आई सरलाबाई यांच्यासोबत हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होता. आई धुणीभांडीचे काम करतात तर सोपान हा मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोपानने दुचाकी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुंबईत पहाटे साकीनाका परिसरात मोठी आग लागली. या आगीत हार्डवेअरचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं.अचनाक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली. मुंबईत पहाटे ३ वाजता साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली होती. सकाळच्या सुमारास आग नियंत्रणात आली होती. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले आहेत.…