Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी शासन स्तरावरील शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदानाची कोट्यवधी रु ची रक्कम तहसील कडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या वर  ही रक्कम तहसील च्या खात्यावर परत आल्याचा प्रकार गुरुवारी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे बँक खातेच आधारशी संलग्न केले नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे तहसीलदार रमेश जसवंत यांनी गुरुवारी थेट बॅंकांना पत्र काढून शेतकऱ्यांची बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहे.      शासनाकडून यापूर्वी विविध योजनांची अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असे परंतु आता शासनाचे सर्व प्रकारचे शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. परंतु सोयगाव तालुक्यातील…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक बघायला मिळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. कारण अजित पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात किंवा भाजप-शिवसेना युती सरकारला देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. जर असे घडले तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४०…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी येथे जयप्रकाश नारायण सर्वांगीण विकास संस्था, भुसावळ नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कस्तुरबा गांधी यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचे प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शन दि.14 आणि 15 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वे उत्तर बाजू केला साइडिंग भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मिलिंद पाटील मंडल साचिव(ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन), समाधान पाटील अध्यक्ष अतिरिक्त मंडळ (ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन), सुधाकर बडगुजर राज्य उपाध्यक्ष (सत्यशोधक…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात अशी चर्चा सुरू होती. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अजित पवार जेव्हा अचानक गायब होतात, तेव्हा काही तरी शिजतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले होते. त्यावेळी त्यांनी पित्ताचा त्रास असल्यामुळे आपण आराम केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुण्यातील दोन कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केला. त्यामुळे या कार्यक्रमांना पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना जावे…

Read More

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चॅनल मॅनेजर आणि सपोर्ट ऑफिसर पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवार 30 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी SBI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी 1 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (SBI Channel Manager and Support Officer Recruitment of 1031 posts apply online) कोणत्या पदांसाठी भरती केली जाईल अधिकृत माहितीनुसार, या प्रक्रियेद्वारे बँक ऑफ इंडियामध्ये चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर 821 पदे, चॅनल मॅनेजर सुपरवायझर 172 पदे आणि सपोर्ट ऑफिसरच्या 38 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांची भरती मुलाखतीच्या आधारे…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राज्यात आदर्श ठरावा असा शासकीय जत्रेचा उपक्रम खासदार उन्मेष पाटील यांनी ते चाळीसगावचे आमदार असताना राबविला होता. ज्यात एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी हजारो नागरिकांना मिळवून दिला होता. त्यावेळी ‘उन्मेष पॅटर्न’ म्हणून ओळखल्या गेलेला हा उपक्रम आता राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसगाव (Jalgaon) येथे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात २७ ते २९ ऑगस्ट २०१९ असा तीन दिवस शासकीय योजनांची  जत्रा हा उपक्रम राबवला होता. ज्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी वंचित असलेल्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला होता. सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून लाखो लोकांना…

Read More

साईमत लाईव्ह सोयगांव प्रतिनिधी महामानव विश्वरत्न  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जरंडी ग्रामपंचायत व बोद्धविहार येथे साजरी करण्यात आली जरंडी येथे सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तर बोद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपसरपंच संजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर लोटन पाटील,मधुकर सोनवणे, दिलीप श्रीराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,बनेखा तडवी,  अमृत राठोड, प्रकाश पवार,राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील लिपिक संतोष पाटील, सतीश बावस्कर,सुरेश चनाल,एकनाथ गायकवाड,भागवत माळी, सुखराम टेलर, सिद्धार्थ मोरे,संतोष मोरे,प्रदीप जगताप,यशवंत कोतकर,संतोष सोनवणे,अशोक साबळे,ज्ञानेश्वर मोरे,समाधान मोरे, कडूबा निकम,सुभाष…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शिवाजीरोड वरील नगरपरिषद मुख्यालय समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला . सदर घटना अशी की संगीता उगले यांच्या स्कॉलर पॉईंट हे स्टेशनरी स्टोअरचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी इसम पेन घेण्याच्या बहाण्याने आला.पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे म्हणत पत्ता विचारला त्यात उगले यांनी सदर पत्ता माहीत नसल्याचे सांगितले.दरम्यान सुट्टे पैसे देत असताना त्यात चिल्लर समाविष्ट होती.त्यातून एक रुपयाचा डॉलर काऊंटरच्या आतील बाजूस संशयिताने मुद्दाम पाडला. उगले या तो डॉलर देण्यास खाली वाकल्या बरोबर आरोपीने काहीतरी वस्तूच्या आधारे…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी मोबाईलमधे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याच्या प्रियकराकडून वारंवार मिळणा-या धमकीला वैतागून सतरा वर्षाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पहुर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर तालुक्यातील लाखोली येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हटले आहे की, संशयीत हा मयत मुलीला नेहमी तु माझ्यासोबत एकत्र रहा नाहीतर मी आपले मोबाईलमधे काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करेन अशी धमकी द्यायचा ‘ त्या ‘ मुलाकडून आत्महत्या करणा-या मुलीला नेहमी त्रास सहन करावा लागत…

Read More

एकीकडे आपले फोन अधिक स्मार्ट होत असताना नवनवीन अपडेट्स त्यात येत आहेत. त्यात सर्वकाही डिजीटल होत असल्याने मोठमोठे महत्त्वाचे व्यवहारही आजकाल फोनवरुनच होतात. त्यामुळे छोट्या मोठ्या पेमेंटपासून ते मोठमोठे व्यवहारही आजकाल फोन बॅकिंगमधून होत असतात. त्यात फोनच्या वाढत्या वापरामुळे आपले सर्व महत्त्वाचे डॉक्यूमेंट्सही फोनमध्ये असून अशा परिस्थितीत फोन हॅक झाल्यास मोठा तोटा होऊ शकतो. त्यात तुम्ही अॅपल युजर असाल तर कंपनीच्या दाव्यानुसार अॅपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे, पण याचा अर्थ आयफोन हॅक होऊ शकत नाही असा नाही. त्यामुळेच अॅन्ड्रॉईड किंवा आयफोन कोणताही फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर काही सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्यापूर्वी फोन…

Read More