जयप्रकाश नारायण सर्वांगीण विकास संस्था, भुसावळ तर्फे स्तुत्य उपक्रम

0
1

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी

येथे जयप्रकाश नारायण सर्वांगीण विकास संस्था, भुसावळ नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कस्तुरबा गांधी यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचे प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शन दि.14 आणि 15 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वे उत्तर बाजू केला साइडिंग भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मिलिंद पाटील मंडल साचिव(ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन), समाधान पाटील अध्यक्ष अतिरिक्त मंडळ (ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन), सुधाकर बडगुजर राज्य उपाध्यक्ष (सत्यशोधक समाज संघ) श्रीकांत वानखेडे संपादक (एम एच 19 न्यूज चैनल) युवराज कुरकुरे (भुसावळ विभाग प्रमुख राष्ट्र सेवा दल) किरण मिस्त्री अध्यक्ष श्री फाउंडेशन) यांच्या उपस्थितीत प्रदर्शनास सुरुवात झाली. हे प्रदर्शन दिनांक 14 व 15 एप्रिल 2023 रोजी रेल्वे प्रवासी आणि जनतेसाठी खुले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धरती चौधरी यांनी केले.

याप्रसंगी कॉम्रेड अनिल बिऱ्हाडे यांनी आपल्या विचारातून नशाबंदी मंडळाचे या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम समाज पूरक आहे. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिक वाढते. समाधान पाटील यांनी सांगितले की मानवी समाज जर जसा प्रगत झाला तसा तो व्यसनाच्या जाळ्यात अडकला आहे. तरुण यात बळी पडत आहेत त्यामुळे समाज व्यवस्था ढासळते आहे. निश्चित या प्रबोधन कार्यक्रमातून प्रबोधन होऊन व्यसनांची तीव्रता कमी होईल.

विजय घेरडे पोलीस निरीक्षक जीआरपीएफ यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यसनांचे जुने प्रकार व अलीकडील काळातील जास्त मोबाईल हाताळणे हेसुध्दा मोबाईलचे लागलेले व्यसनच आहे. त्यामुळे मेंदू, डोळे पूर्ण शरीर कमकुवत बनते . मानसिक स्वास्थ्य बिघडते चिडचिडेपणा वाढतो त्याचे परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. नागरिकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सन्माननीय राधाकिशन मीना साहेब यांनी व्यसनमुक्त चित्र प्रदर्शनाचे आयोजना बाबत कौतुक केले. प्रदीप शेजवलकर जीआरपीएफ गोपनीय विभाग यांची उपस्थिती लाभली. सुधाकर बडगुजर, मधुकर दादा सपकाळे, लोक संघर्ष मोर्चाचे भुसावळ तालुका अध्यक्ष आकाश कुरकुरे, राणे उपस्थित होते. भूषण चौधरी मोहन ठाकूर मनोज वर्मा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. असंख्य रेल्वे प्रवासी व नागरिक यांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here