साईमत जळगाव प्रतिनिधी ‘‘नकुशी’’ म्हणजे पद्मश्री स्व.सिंधुताई सपकाळ… माईंच्या जीवनाची सुरुवात जरी नकुशीने झाली असली तरी त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या ‘जीवनाचं सोनं’ केलं. अशा या अनाथांच्या माईंना विगत दि. 4 जानेवारी 2022 रोजी परमेश्वराने त्यांच्याजवळ स्थान दिले. असे असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा ममताताई सपकाळ व सहकारी अविरत पुढे नेत आहेत. ममताताई सपकाळ म्हणजे सिंधुताई सपकाळांची लेक होय. सिंधुताईंनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोटच्या गोळ्याचा म्हणजेच ममताताईचं काय करायचं? हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताताईंच्या समजुतदारपणामुळे व आसामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील रहिवासी तथा शाह बिरादरीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अमानुल्ला शाह यांनी आपल्या नातवाचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने उपस्थित पाहुण्यांना सरबत पाजून लावत एक आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सालार नगर येथील बिस्मिल्ला मशीद मध्ये हा आदर्श विवाह संपन्न झाला. यावेळी मुस्लिम समाजातर्फे मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी नवरदेव मोहम्मद सालीफ, नवरदेवाचे वडील डॉ. एजाजोद्दीन, नवरी अनम शाह, नवरीचे वडील अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्रो. अशपाक उस्मान यांचे अभिनंदन केले. शाह बिरादरीचे डॉ. अमानउल्लाह शाह यांनी जळगाव जिल्ह्यात मुस्लिम समाजाची अँग्लो उर्दू हायस्कूल ही एकमेव हायस्कूल असताना त्यांनी मुस्लिम विद्यार्थिनींसाठी १९७९ साली अंजुमन खिदमत ए…
साईमत सोयगाव प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे रयतेचे राजे छञपती राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी छञपती शाहू महारांजांच्या प्रतिमेचे समाजसेवक सुनिल काळे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य योगेश बोखारे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे याच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्या नंतर शासन निर्णया नुसार शाळेतील विद्यार्थ्यांना सोयगांंव शहाराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा आशाबी तडवी,सुनिल काळे,योगेश बोखारे तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मनिषा जेठे,सदस्या सुनिता जोहरे,मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या हस्ते निकाल पञक वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.निकाल पञक मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळाला.कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी परिश्रम…
साईमत नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- दक्षिण पूर्व रेल्वेने( South Eastern Railway) ॲपरेंटिस पदांसाठी भरती सुरू केली आहे. रेल्वेकडून(Railway) नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक तरुण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतेीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून आहे. रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरतेीच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेत ॲपरेंटिसच्या ५४८ रिक्त पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये साधारण गटांसाठी २१५ , ईडब्ल्यूएससाठी ५९, ओबीसींसाठी १४८, एससींसाठी ८५ आणि एसटी उमेदवारांसाठी ४१ पदे आरक्षित आहेत. रेल्वेत ॲपरेंटिस भरतेीसाठी अधिकाधिक वय २४ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट…
साईमत चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याया आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने पोक्सो व इतर विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे. दीपक रविन्द्र भिल (रा. अकुलखेडा , ता.चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत पिडीत मुलीच्या आईने 5 फेब्रुवारी, 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला (गुरन. 25/20) भा.दं.वि. 363 कलमानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दीपक भिल 17 फेब्रुवारीरोजी देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे पोलिसांना पिडीत मुलीसोबत मिळून आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध या गुन्हयात भादंवि. 376 (1) (ए), 376 (3) सह…
साईमत थिरूवनंतपुरम् (वृत्तसंस्था)- दहशतवादी कट असलेल्या कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे, असे भाष्य आज पंतप्रधशन मोदी यांनी आज केले. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेमार्फत बौध्द पौर्णिमे निमित्त दान परमिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. अनिल चिकाटे उपस्थित होते. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी अभिधम्म:चर्चा व चिंतन या विषयावर विचार मांडले. बौध्द धम्मात दानाला महत्व असल्याने डॉ.म.सु.पगारे लिखित ग्रंथ यावेळी विविध विभागांना देण्यात आले. डॉ. पगारे आपल्या भाषणात म्हणाले की, कुठल्याही मोहाची अपेक्षा न ठेवता आपण जे ज्ञानदान करतो ते मनाला समाधान देणारे असते. अभिधम्मपिटकामध्ये चित्त, निब्बाण,चेतसिका व शिल यांना महत्व आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पारधे यांनी केले. बौध्द…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी व फिल्म आणि ड्रामा विभागातील विद्यार्थ्यांनी नियोजित केलेल्या “वर्तुळ” या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी डॉ. व्ही. जे. पाटील, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय रणखांबे, प्रा. अशोक पाटील, प्रा. दीपक किनगे, प्रा. विनोद नन्नवरे, प्रा. सुचित्रा लोंढे तसेच फोटो व व्हिडिओग्राफी विभाग प्रमुख प्रा. राज गुंगे उपस्थित होते. या संपूर्ण लघुपटाचे चित्रीकरण, संकलन, ध्वनीमुद्रण हे विभागाचे विद्यार्थी करत आहेत. चित्रपट क्षेत्रात खांदेशचा सहभाग वृद्धींगत व्हावा या उद्देशाने महाविद्यालयात हा विभाग सुरु करण्याचा हेतू साध्य होताना दिसत आहे…
साईमत जळगाव प्रतिनिधी सरकारी कामे करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांचे सुमारे 300 कोटी थकल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सोबत घेत जिल्ह्यातील कंत्राटदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली . तथापि जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या 280 कोटी रूपये खर्चाच्या कामांवरील बहिष्कार या कंत्राटदारांच्या संघटनेने कायम ठेवलेला आहे. कंत्राटदारांनी नव्या कामांवर टाकलेल्या या बहिष्कारामुळे गेल्या दीड महिन्यात जिल्हयातील सगळी कामे ठप्प झालेली आहेत. या कामांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करताना कंत्राटदारांनी थकबाकीच्या मागणीसाठी आधी लाक्षणिक उपोषणही केले होते. या उपोषणकर्त्या कंत्राटदारांची भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाठील यांनी या समस्येबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. निधी वाटपात कसा अन्याय झाला व त्यामुळे…
साईमत सोयगाव प्रतिनिधी वातावरणाच्या चढ-उतारामुळे तसेच बदलत्या हवामान बदलामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. वादळी पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतात अजून मका, ज्वारी, बाजरी हे रब्बी चे पिके उभी आहेत तर काही शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी होऊन शेतात पडलेली आहेत तालुक्यात गेल्या वर्षीच्या कापूस बाजार भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कपाशी परदड वर भर दिला होता मात्र शेतकऱ्यांना मागच्या वर्षाच्या तुलनेत या हंगामात कमी भावात कापूस विकावा लागला तर काही शेतकऱ्यांनी भाववाढ होईल या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. खरीप पूर्व हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना शेतीकाम उरकून घेण्याची घाई…