शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाची अनुदानाची रक्कम तहसीलच्या खात्यात पडून

0
8
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
शासन स्तरावरील शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदानाची कोट्यवधी रु ची रक्कम तहसील कडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या वर  ही रक्कम तहसील च्या खात्यावर परत आल्याचा प्रकार गुरुवारी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे बँक खातेच आधारशी संलग्न केले नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे तहसीलदार रमेश जसवंत यांनी गुरुवारी थेट बॅंकांना पत्र काढून शेतकऱ्यांची बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहे.
     शासनाकडून यापूर्वी विविध योजनांची अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असे परंतु आता शासनाचे सर्व प्रकारचे शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. परंतु सोयगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न केले नसल्याने तहसील कडून पाठविण्यात आलेले अनुदाना ची कोट्यवधी रु ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न होता अनुदानाची रक्कम परत तहसील च्या खात्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने बँकांना पत्र काढून शेतकऱ्यांची बँक खाते तातडीने आधारशी संलग्न करण्याचे लेखी पत्र काढून गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालयवर नोटीस बोर्ड वर याबाबत अधिसूचना चिटकवून शेतकऱ्यांना बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here