आज पुन्हा अजित पवारांचे कार्यक्रम अचानक रद्द; पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले

0
1

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात अशी चर्चा सुरू होती. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अजित पवार जेव्हा अचानक गायब होतात, तेव्हा काही तरी शिजतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले होते. त्यावेळी त्यांनी पित्ताचा त्रास असल्यामुळे आपण आराम केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुण्यातील दोन कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केला. त्यामुळे या कार्यक्रमांना पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना जावे लागले.

 

पुण्यात आज अजित पवार दोन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित शेतकरी मेळावा आणि पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here