साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
राज्यात आदर्श ठरावा असा शासकीय जत्रेचा उपक्रम खासदार उन्मेष पाटील यांनी ते चाळीसगावचे आमदार असताना राबविला होता. ज्यात एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी हजारो नागरिकांना मिळवून दिला होता. त्यावेळी ‘उन्मेष पॅटर्न’ म्हणून ओळखल्या गेलेला हा उपक्रम आता राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने केली चर्चा
खासदार उन्मेष पाटील यांनी नेमके कसे आयोजन केले होते, त्यासाठी यंत्रणा कशी राबवावी लागली, त्यासाठी कशा बैठका घेतल्या अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांना मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मुंबईत आमंत्रित केले होते. त्या अनुषंगाने उन्मेष पाटील यांनी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या संकल्पनेची पूर्ण माहिती वजा विस्तृत अहवाल सादर केला होता.
त्यानंतर शासनाने देखील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा ‘उन्मेष पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नियोजन देखील सुरु झाले असून लवकरच राज्यात सर्वत्र चाळीसगावला भरवली होती, अशी ‘शासकीय योजनांची जत्रा’ भरवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल.
– उन्मेष पाटील, खासदार