मेष – चंद्राचा सातवा गोचर व्यावसायात भरभराटी आणू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल. श्री सूक्ताचा पाठ करावा. तीळ दान करावी. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. शुभ रंग : पिवळा. वृषभ – आजचा दिवस संघर्षमय राहिल. व्यवसायात नवा बदल करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. बुध आणि चंद्राची युती नोकरीत बदल करण्याचे संकेत देतो. प्रेम यशस्वी होईल. शुभ रंग : आकाशी. मिथुन – बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी शुभ संकेत आहेत. सूर्य- बुधाची युती नोकरी विशेष लाभ मिळवून देईल. नवा बिझनेस सुरू करू शकतात. तीळ दान करावी. शुभ रंग : हिरवा. कर्क – राशीचा स्वामी चंद्र आर्थिक भरभराटीसाठी पाठबळ…
Author: Saimat
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहरात झालेल्या रिमझिम पावसात पहिल्याच पावसात सोयगावच्या आठवडे बाजारात चिखलच चिखल झाला होता त्यामुळे गृहिणींना आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठी तारांबळ उडाली होती बाजारात चिखलात पायी फिरणे अवघड झाले होते त्यामुळे मोठी गैरसोय झाली. सोयगाव आठवडे बाजार शहरातील पंचायत समितीच्या मैदानात भरतो नगर पंचायतीकडे आठवडे बाहेरची देखभाल आहे परंतु नगर पंचायतीने या आठवडे बाजारच्या मैदानाची मॉन्सून पूर्व तयारीच केलेली नाही त्यामुळे पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य बाजारात पसरले होते त्यामुळे महिलांची चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान सोयगाव च्या आठवडे बाजाराचा कर वसुलीची जबाबदारी नगर पंचायतीकडे आहे मात्र दुकानदारांना आठवडा बाजारात कोणतीही सुविधा मिळत नसुन पावसाळ्यात या आठवडे बाजारात…
साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कांग नदीपात्रात वाळू माफियांचा थैमान दिवसाढवळा सुरू आहे, मात्र याकडे महसूल विभागातर्फे दुर्लक्ष होत असून, या वाळूमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थानकडून होत आहे. तालुक्यातून वाहनाऱ्या सामरोदच्या कांगनदी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक सामरोद मध्ये केली जात आहे. प्रशासनातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे प्रतिबंध जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास सामरोद येथील नदीपात्रातून व कागनदी नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून सामरोद ,तळेगाव शकरपुरा या गावात हैदोस घालत आहेत, महसूल विभाग काहीही कारवाही करत…
आयसीसी (ICC) वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आज सकाळीच बीसीसीआयने (BCCI) घेतलेल्या पत्रकार परिषेदत वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. तेही टूर्नामेंट सूर होण्याच्याअवघ्या १०० दिवसा आधी जाहीर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील (Mumbai) एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा अधिक चर्चेत असणारा महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळलाजणार आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे कि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची आखणी केली असून त्याचे वेळापत्रक जुनमध्येच देशांना पाठवला होता. मात्र या मुद्यावर पाकिस्तानने अडथळा आणलाच होता. वेळेपत्रका नुसार सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी…
साईमत जळगाव प्रतिनिधी आज शहरात होणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत पोलीस कवायत मैदानावर कार्यक्रम होणार असून सर्वसामान्यांनसाठी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत आकशवाणी चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप हा रास्ता बंद राहील. त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहित पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय न होण्याकरीत प्रशासनाने अनेक ठिकाणी वाहनस्थळची व्यवस्था करून दिली आहे. प्रशासनाने उपलब्ध केलेले वाहनस्थळ एकलव्य संकुल येथे : एरंडोल , पारोळा , अमळनेर , धरणगाव या तालुक्यातील येणाऱ्या वाहनासाठी जागा उपलब्ध केली आहे. जीएस मैदान येथे : यावल व चोपडा तालुक्यातील वाहने ते ममुराबाद मार्गे…
रेल्वे विभागात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) काम करण्याची इच्छा असणाऱ्यसाठी एक खुश खबर आहे . ते म्हणजे रेल्वे अंतर्गत ग्रुप सी लेवल – २ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल – १ या पदांसाठी भरती केली जाणार असून भरतीअंतर्गत ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु कार्यांत आली आहे. या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाण्याकरिता संपूर्ण माहिती वाचा. पदाचे नाव -ग्रुप “सी” लेवल-२ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ पदांसाठी एकूण पदसंख्या – ८…
साईमत धुळे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांतर्फे आज शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी राज्य सरकारचा विरोध, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना अखंडित १८ तास वीजपुरवठा वीज वितरण विभागातर्फे देण्यात यावा. त्याचबरोबर शेतीसाठी असलेल्या नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा; या मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांतर्फे शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. राज्य सरकार, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधामध्ये घोषणाबाजी…
साईमत कजगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, यावेळी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य अधिकारी, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना लागणाऱ्या गोळ्या औषधीचे किट ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ महाजन ,उपसरपंच हाजी शफी मण्यार , मा, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ महाजन , सरपंच पुत्र अनिल महाजन , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अशोक राजपूत , मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, संभाजी पवार , अनिल…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी सायंकाळी आपल्या काका सोबत शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव इटियॉस (Etios) या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून तर एकजण गंभीर जखमी झाल्याची ,घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा वाहन चालक कार सोडून पळून गेलाअसून ते वाहन साई चंद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे आहे. या प्रकरणी चाळीसगाव(Chalisgaon) शहर पोलिस स्टेशनला वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव (Chalisgaon) शहरात शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दररोज प्रमाणेते दि. २३ रोजी सुद्धा सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे आपल्या पुतण्या राहुल राजू…
साईमत नंदूरबार प्रतिनिधी नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाटा शोरूम मध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना टाटा कंपनीची कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली व एक्सीलेटर जोरात दिल्या गेल्याने दुसऱ्या कार वर…