World Cup 2023: चालो तो फीर हो जावो तय्यार ! २०२३ वर्ल्डकपची प्रतीक्षा संपली ; वेळापत्रक केले जाहीर

0
1
World Cup 2023 चालो तो फीर हो जावो तयार ! २०२३ वर्ल्डकपची प्रतीक्षा संपली ; वेळापत्रक केले जाहीर

आयसीसी (ICC) वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आज सकाळीच बीसीसीआयने (BCCI) घेतलेल्या पत्रकार परिषेदत वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. तेही टूर्नामेंट सूर होण्याच्याअवघ्या १०० दिवसा आधी जाहीर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील (Mumbai) एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा अधिक चर्चेत असणारा महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळलाजणार आहे.

अहवालात असे सांगण्यात आले आहे कि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची आखणी केली असून त्याचे वेळापत्रक जुनमध्येच देशांना पाठवला होता. मात्र या मुद्यावर पाकिस्तानने अडथळा आणलाच होता. वेळेपत्रका नुसार सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या रणसंग्रामला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, रणसंग्रामचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here