शेतकऱ्यांच्या वितरण विभागाकडे विविध मागण्यांसाठी शिंदखेडा येथे जन आक्रोश मोर्चा

0
33
शेतकऱ्यांच्या वितरण विभागाकडे विविध मागण्यांसाठी शिंदखेडा येथे जन आक्रोश मोर्चा

साईमत धुळे प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांतर्फे आज शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी राज्य सरकारचा विरोध, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला.

शेतकऱ्यांना अखंडित १८ तास वीजपुरवठा वीज वितरण विभागातर्फे देण्यात यावा. त्याचबरोबर शेतीसाठी असलेल्या नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा; या मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांतर्फे शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. राज्य सरकार, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधामध्ये घोषणाबाजी केली. यावेळेस तहसील कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here