साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी लांबवल्याप्रकरणी शनिवार, १७ जून रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी योगेश भोजू पाटील हा तरुण वास्तव्यास आहे १० जून रोजी रात्री सव्वा सात वाजता योगेश हा भाऊंच्या उद्यानात आला होता . यादरम्यान त्याने त्याची एम.एच. १९ सीएस ०२६४ या क्रमांकाची दुचाकी भाऊंच्या उद्यानासमोर उभे केली. आठ वाजता परतल्यानंतर त्याला त्याची दुचाकी दिसून आली नाही इतरत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने सात दिवसानंतर शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास विजय खैरे हे करीत आहेत
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाला किमान ७० ते ७५ हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव – जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार…
साईमत जळगाव प्रतिनिधी कापसाला बारा हजार रूपयांचा भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण हे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुटले. कापसाला बारा हजार रूपयांचा किमान भाव मिळावा, तसेच शेतकर्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात याव्ो या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिनांक १४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी भेटी देऊन पाठींना दर्शविला होता. उपोषणाच्या दुसर्या दिवशी जागरण आणि गोंधळाच्या अनोख्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला होता. दरम्यान, दि १६ जून रोजी अमळनेरात राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम झाला.…
साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जळगाव दौऱ्यावर होते. काल जळगाव येथे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील भेट आणि राजकीय हस्तांदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. खा.शरद पवारांना भेटण्यासाठी याठिकाणी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. खा.पवार…
साईमत ओझर प्रतिनिधी ओझर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. ए. एल. हायस्कूल म.मा. 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयाचे कार्यतत्पर मुख्याध्यापक मा.आर.एल.पगारे सर यांचे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व चिमुकले बालगोपलांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत व…
साईमत भुसावळ प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी आते भावाला कानशिलात लगावल्याचा राग मनात धुमसत ठेवला होता. अशातच मध्यरात्री तो तरुण डोळ्यासमोरून जात असताना संशयित तरुणाला राग आला. त्याने त्या तरुणाला थांबवले. शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाल्या आणि शेवटी संशयित तरुणाने त्या तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिले. यामुळे तो दुचाकीवर (Bike) आपटला जाऊन जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या खुनाच्या (Murder) गुन्ह्याप्रकरणी भुसावळ (Bhusawal) तालुका पोलीस स्थानकात संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, मंगल शांताराम शेळके (वय २३ ) हा आपल्या परिवारासह तालुक्यातील फेकरी ( Fekari) येथील वाल्मिक…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील हुडको घरकुल योजनाकामी ५९ कोटी रुपये बेकायदेशीरपणे खर्च करणाऱ्या तत्कालीन ४८ नगरसेवकांकडून प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली रक्कम वसूल करावी. याबाबत आयुक्तांनी १५ दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास आयुक्तांविरुद्धच पीआयएल दाखल करणार, अशी हायकोर्टाच्या वकिलामार्फत नोटीस सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना बजावल्याची माहिती देण्यासाठी शनिवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामुळे तत्कालीन नगरसेवकांमध्ये पुन्हा एकच खडबड उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ता तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी शनिवारी सायंकाळी हॉटेल मोरक्को येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सामाजिक…
साईमत जळगाव प्रतिनिधी खरीप हंगामाची नवीन लागवड होत असताना शेतकऱ्याच्या कापसाला (Cotton) भाव मिळत नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात 30 ते 35 टक्के कापूस घरातच कापूस पडून आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्कांसाठी राज्यातील कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल 12 हजारांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, बुधवारपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘मी शेतकरी’ लिहिलेली गांधी टोपी परिधान करीत आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालया(Collector Office) समोर बुधवारी सकाळी 10 वाजेपासून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP) बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. त्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. दरम्यान, 19 लाख 58 हजार 139 रुपये किमतीच्या 26 मोटारसायकलींसह चोरट्याला जळगावच्या (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ताब्यात घेतलं आहे. भडगाव (Bhadgaon) येथील एका साई अँटो बजाज शोरुममधील तब्बल 30 नव्या मोटारसायकली चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी संबंधित शोरूमच्या मालकास स्टॉकबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून 14 पल्सर मोटारसायकली व 16 प्लॅटीना मोटारसायकली अशा एकूण 30 मोटारसायकली 22…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील जामडी येथे फकिर तरुणाची अल्पवयीन तरुणाने पूर्ववैमनस्यातून चाकूचे वार करीत हत्या केली होती. या प्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्या तबरेज शहा याकूब शहा ( वय ३४ ) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. हा राग डोक्यात ठेवून तरुणीच्या अल्पवयीन भावाने गुरुवारी दुपारी तरुणावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या खुनानंतर संतप्त नातेवाईकांनी गुन्ह्यातील आरोपींना अटकेची मागण केली होती. खून प्रकरणी…