सामरोद येथील कांग नदीपात्रात वाळू माफियांचा थैमान

0
5
सामरोद येथील कांग नदीपात्रात वाळू माफियांचा थैमान

साईमत जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कांग नदीपात्रात वाळू माफियांचा थैमान दिवसाढवळा सुरू आहे, मात्र याकडे महसूल विभागातर्फे  दुर्लक्ष होत असून, या वाळूमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थानकडून होत आहे.

तालुक्यातून वाहनाऱ्या सामरोदच्या कांगनदी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक सामरोद मध्ये केली जात आहे. प्रशासनातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे प्रतिबंध जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास सामरोद येथील नदीपात्रातून व कागनदी नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून सामरोद ,तळेगाव शकरपुरा या गावात हैदोस घालत आहेत, महसूल विभाग काहीही कारवाही करत नसल्यामुळे वाळू धंदा मात्र जोरात चालू आहे. वाळू चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू चोरट्यांविरोधात महसूल विभाग ने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

2 महिन्यापूर्वी सामरोद येथील 8 वर्षीय मुलीला त्याच नदी पत्रात जीव गमावावा लागला होता, कारण वाळू उपास्यमूळे  नदी पत्रात मोठ मोठे खड्डे पडल्या मुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या एकाच ठिकाणी अनेक लोकांचे वाहने बुडाले देखील आहे , तसेच बाळू पाटील यांचे छोटे ट्रॅक्टर बुडाले तेव्हा जीव हानी वाचली नंतर योगेश कोळी यांची बौल गाडी तर त्यागाडी मध्ये तीन मुली आणि योगेश कोळी यांची बायको असा परिवार होता पण सुदेवाने जीवित हानी झाली नाही. आणि काय लगेच 2 महिन्या नंतर 8 वर्षय मुलीला त्याच खड्ड्या मध्ये आपला जीव गमवावा लागला ,एवढे होऊन सुद्धा महसूल विभाग या सर्व गोष्टीकडे आपली पाठ फिरवत आहे का ते जाणून बुजून कार्यवाही करत नाही असे सामरोद येथील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुलगी वारल्या मुळे दोन दिवस वाळू चोरत्यांनी वाळू वाहतूक बंद ठेवली होती. आणि नंतर वाळू माफियानी पुन्हा जोमाने वाळू चोरी करायला सुरुवात केली आहे, हे सर्व होऊन सुद्धा महसूल विभाग काही कारवाई का करत नाही या गोष्टीचा फायदा घेत वाळू माफियांनी थैमान घातला आहे. लवकरच तहसीलदार साहेब यांनी वाळु चोरट्यावर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here