साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
सायंकाळी आपल्या काका सोबत शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव इटियॉस (Etios) या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून तर एकजण गंभीर जखमी झाल्याची ,घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा वाहन चालक कार सोडून पळून गेलाअसून ते वाहन साई चंद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे आहे. या प्रकरणी चाळीसगाव(Chalisgaon) शहर पोलिस स्टेशनला वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव (Chalisgaon) शहरात शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दररोज प्रमाणेते दि. २३ रोजी सुद्धा सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे आपल्या पुतण्या राहुल राजू कुंभार (वय २४) याच्या सोबत एमएच १९ बीए ३६६५ या दुचाकीने शेतात जात असताना रुद्र हनुमान मंदिराजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या एमएच. १२ केएन ९०९५(इटियॉस) या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेने गोपाल कुंभार व राहुल कुंभार हे रस्त्यावर फेकले गेलेत. तर राहुल यास डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात (Accident) होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राहुल कुंभार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला तात्काळ धुळे येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी गोपाल कुंभार यांच्या फिर्यादीवरून फरार वाहन चालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.