साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना स्थानबध्द केले आहे. गेल्या नोव्हेंबरपासून ते आजतागायतत जिल्ह्यातील २१ विविध गुन्हेगारांना स्थानबध्द केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यातील प्रकाश चंद्रकांत कंजर (वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे. यासोबत सोनू रामेश्वर पांडे (वय २४, रा. मामाजी…
Author: Saimat
साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषद (Yawal Nagarparishad) हद्दीत प्रभाग क्र. 3 मधील काही भागात रस्ते गटारी नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या 2/ 3 वर्षात वारंवार लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा नगरपालिकेने दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे आज दि. 30 जून 2023 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणपती नगर,आयेशानगर,तिरुपती नगर,वासुदेवनगर,गंगानगर या भागात रस्ते गटारी नसल्यामुळे तसेच नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष यांच्यासह यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून मराठा महासंघाच्या वतीने दिनांक 30 जून 2023 रोजी चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मराठा महासंघाच्या मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या चौकात यापूर्वी सिग्नल यंत्रणा सुरू होती ती अचानक बंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता मात्र आता महाराजांचा पुतळा झाल्याने ते एक आकर्षण स्थळ झाले आहे. वाहन चालक यांचे लक्ष पुतळ्याकडे जाते आणि आजूबाजूला मोठमोठे डिजिटल बॅनर लावले जात असल्याने एकाच वेळी सर्व वाहन जात येत असल्याने डिजिटल बॅनर कडे वाहन…
साईमत ओझर प्रतिनिधी वारकऱ्यांच्य वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात चांदोरी (ता.निफाड) येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी या पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरले.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी मात्र पांढरा झब्बा हातात भगव्या पताका,डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध,गळ्यात टाळ घेऊन आलेली मुले आणि नऊवारीत नटून थटुन,केसात गजरा,डोक्यावर तुळस आणि पाण्याचे हंडे घेऊन आलेल्या मुला आणि “शाळा शिकताना तहान भूक हरली,विठ्ठल नामाची शाळा भरली” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले बाल वारकरी अवतरले. हा नयनरम्य…
साईमत जळगाव प्रतिनिधी एरंडोल-कासोदाकडे जात असताना एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्री पावणे ९ वाजेच्या सुमारास झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात गाडीमधील इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक…
साईमत जळगाव प्रतिनिधी पावसाच्या सरींच्या वर्षावातही भाविकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या जयघोषासह टाळ, चिपळ्यांचा निनादाने गुरुवारी (दि. 29) साजरा झालेल्या रथोत्सवामुळे अवघी पिंप्राळानगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरात गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंप्राळा नगरीत विठ्ठल मंदिर संस्थानच्या 148 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ‘माऊली..माऊली’ चा जयघोष ऐकायला…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील अतिक्रमण हटविण्यात येवून तेथे ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या रस्त्यावर नाश्तापाण्याच्या गाड्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. सायंकाळी खासगी बसेस जागा अडवून ठेवतात. त्यामुळे हा रस्ता ‘नो हॉकर्स झोन करणे गरजेचे असल्याने महापालिकेने तसा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच अमृत 2.0चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव पुन्हा महासभेत सादर करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी महासभेने अमृत 2.0 चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा ठराव केला होता. परंतु मुंबई येथील शहा टेक्निकल कन्स्ल्टंट मुंबई यांनी असमर्थता दर्शविल्यामुळे आता पुन्हा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला आहे. दि.7 जुलै…
साईमत जळगाव प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली.तसेच पहिल्या टप्प्यात जळगाव होईल. जिल्ह्यातील 460 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च येईल. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 हजार 682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 अशा एकूण 5 हजार 220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.…
साईमत छ. संभाजीनगर प्रतिनिधी जळगावातील एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. या मुलीचं वय अवघे पंधरा वर्ष असून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ही मुलगी एका तरुणासोबत राजस्थानात सापडली. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आले. तिच्या आईने उच्च न्यायालयात गर्भपाताची परवानगी मिळवण्साठी याचिका दाखल केली. पण खंडपीठाने यास स्पष्ट नकार दिला. गर्भपात करण्यास परवानगी का नाकारली? वैद्यकीय तपासामध्ये या मुलीच्या उदरात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिच्या आईने जळगावमधील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यास परवानगी मिळावी अशी याचिका उच्च…
साईमत जळगाव प्रतिनिधी मुख्यामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शाशन आपल्या दारी या कार्यक्रमात दिलेल्या जवाबदारीमध्ये हलगर्जी झाल्या प्रकरणी एसटी महामंडळाच्या खुशाल मोरे अश्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भगवान जगनोर विभाग नियंत्रक यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती दिली . या कारवाईची चर्चा महामंडळात कालपासून सुरु आहे. एकनाथ शिंदे हे राज्यचे मुख्यामंत्री व परिवहन विभागाचे मंत्री असून ते मंगळवारी शाशन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त जळगाव शहरात आले होते. या कार्यक्रमात मोरे यांच्या नियोजनाची जवाबदारी देण्यात आली होती. मात्र मोरे हे कामावर त हजर झाले पण आपल्याला सोपवलेली कामे न करता तेथून निघून गेले . नियोजनाचा आढावा घेत असताना त्यात मोरे हे…