साईमत जळगाव प्रतिनिधी येथील भरारी फाउंडेशन व वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १३० पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फी वाटप करण्यात आली. तसेज २६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले. भरारी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने ४५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धानवड येथील पाच गरजू शेतकऱ्यांना रतनलाल बाफना अनुसंधान केंद्रातर्फे 10 बैल शेतीच्या कामासाठी मोफत देण्यात आले. तसेज २० शेतकऱ्यांना मोफत बियाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप आले.पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे झालेल्या या…
Author: Saimat
साईमत पाचोरा प्रतिनिधी येथे दर शनिवारी आठवडे बाजारात मोठा बाजार भरतो. गेल्या शनिवारी बाजारात कैऱ्या नागरिकांना पहायला मिळाल्या. पाऊस पडण्याच्या आधी घराघरात कैरीचे लोणचे केले जाते. तालुक्याचा सर्वात मोठा बाजार असल्याने बाजारात नागरिकांनी कैऱ्या खरेदीसह फोडण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे लोणच्यासाठी कैरी फोडण्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. कैऱ्या खरेदीसाठी सकाळीच गर्दी बाजार घाटावरून मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. त्यात नीलम, चपाटा, सरदार, गावठी या कैऱ्यांना मोठी मागणी होती. सरासरी ३६ ते ६० रुपये किलोप्रमाणे कैऱ्यांना भाव होता. छोट्या आकारातील कैरीला ३० ते ५० रुपये आणि गावठी कैरीला ३५ ते ६० रुपये असा भाव मिळाला होता. खेड्यासह शहरातील नागरिकांनी कैऱ्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain) यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय (Padmalaya) येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली. विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. १ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा गणपती…
साईमत जळगाव प्रतिनिधी यावर्षी तापमानाचा पारा ४८°© वरून ३५°© च्या जवळपास आलेला आहे. मान्सून यावर्षी रुसल्या प्रमाणे जूनअखेर केवळ जेमतेम चारच दिवस बरसला असून जेमतेम २१ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प वगळता जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांची पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, अर्जूनसागर, हरणबारी, नागासाक्या, माणिकपंुज आिद प्रकल्पांमधून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. त्या गिरणा प्रकल्पात आजमितीस केवळ २१.७४ टक्के साठा आहे. जळगाव जिल्हयात ९६ मध्यम, लघू, मोठया प्रकल्पांत सरासरी ३०.४५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.नाशिक जिल्ह्याीतल चणकापूर, अर्जूनसागर(पुनद)सह अन्य प्रकल्पांतून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. या गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी लग्न कार्यासाठी ना लग्नपत्रिका, ना मानपान अशा सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य होते. अशातच दोन्ही परिवार, वधू-वर यांनी मान्यवरांच्या आग्रहाचा मान ठेऊन साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. लग्नाची पुढील तयारी सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ना मानपान, ना रुसवे-फुगवे, ना हुंडा शिवाय साधेपणाने सलमान-फराहबानो यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. साखरपुड्याला आलेले मण्यार परिवार साखरपुड्याला आले अन् ‘नवरी’ घेऊन कजगावला गेल्याचा प्रत्यय अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला आहे. अशा निर्णयाचे मन्यार समाजबांधवांनी स्वागत केले आहे. येथे हाजी हन्नान शेख गुलाब यांची मुलगी फराहबानो यांचा कजगाव…
साईमत मुंबई प्रतिनिधी एक वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी रविवारी २ जुलै रोजी बंडखोरी केली आहे. अजित पवार हे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. पण जेव्हा शिंदे गटाने बंडखोरी केली. तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत. म्हणून आम्ही बंडखोरी केली. असा दावा शिंदे गटाने केला होता. अजित पवार यांच्या जाचामुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. असे वक्तव्य शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी केले होते. आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे निधी न…
साईमत सोयगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ३७० किल्ले सर करण्यासाठी केरळहून निघालेल्या शिवभक्त युवक एम. के. हमरासचे सोयगाव शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी भाऊ काळे,व दैनिक बाळकडू चे पत्रकार विजय काळे यांनी स्वागत केले. केरळहून तो निघाला असून या सायकल राईडमध्ये तो सर्व किल्ल्यांना भेटी देवून आपली ही आगळी वेगळी सफर पूर्ण करणार आहे. शिव भक्त हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होवून सायकलवरुन गडकोटांना भेट देत आहे. त्याने महाराष्ट्रातील ११७ किल्यांना भेट दिला. यावेळी आदी शिवप्रेमी त्यांचे स्वागत करण्यास उपस्थित होते. हमरासनी छ.संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे.…
साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल परिचर श्री.नामदेव बडगुजर नुकतेच सेवानिवृत्त झाले .त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष श्री. मिठूलालजी अग्रवाल, सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा,अँड. श्री.प्रकाशचंद सुराणा,श्री. श्रीरामभाऊ बडगुजर, श्री.अशोक जैन ,श्री.रवींद्र माटे, नगरसेवक विजय बडगुजर ,प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी,उपप्राचार्य डॉ. विनोदकुमार चौधरी , माजी उपसरपंच संजय बडगुजर ,संजय मोहन बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.नामदेव बडगुजर, त्यांच्या धर्मपत्नी सौ. रंजना बडगुजर यांचा संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. मनोज निकाळजे, श्री. शेखरसिंग चव्हाण यांनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी नुकताच कलादर्श प्रस्तूत,महालक्ष्मी थियेटर्स निर्मित, ‘वेगळं असं काहीतरी ‘ या स्थानिक कलावंतांनी संभाजीराजे नाट्यगृहात सादर केलेल्या नाटकास नाट्य-रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रेक्षकांच्या गर्दीने प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होता. नाटकाच्या संन्मानिकांची आगावू नोंदणी झाल्याने नाटक रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. एरवी घरोघरी छोट्या – मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला ‘ फ्यांटसी ‘ची खमंग फोडणी दिली तर ,त्याची चव काही वेगळीच वाटते ,अशाच शेवटपर्यंत निभावून न्यावयाच्या ‘या’ गोड नात्यावर उपरोधिक पण खुशखुशीत भाष्य करणारे नाटक ‘रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स’ च्या अनमोल सहकार्याने जळगावकर रसिकांसाठी सादर झाले . प्रारंभी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी लागलेल्या हाउस-फुल्ल च्या फलकास आर.सी.बाफना ज्वेलर्स चे जनसंपर्क प्रमुख…
साईमत सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने काल (शनिवार) सोयगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांची बैठक जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री मारोती मंदिर सभागृहात पार पडली . या बैठकीमध्ये उपस्थित सर्व नाभिक बांधवांच्या सर्वानुमताने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या खालील कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत . तालुका शाखा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून केदार राऊत (गोंदेगाव), उपाध्यक्ष – बापुराव पंडित (सोयगाव),राजु गलबले (सावळदबारा),सचिव – अशोकराव वाघ , सहसचिव – ज्ञानेश्वर एलिस (सोयगाव) सह दिलीप सोनवणे ,किरण निकम ,दत्तात्रय एलिस,पवन क्षीरसागर ,विशाल सोनवणे v दिनेश सोनवणे आदींचा समावेश आहे . युवक तालुका शाखा अध्यक्ष – रामकृष्ण सोनवणे (सावळदबारा), उपाध्यक्ष – योगेश निकम…