पोलीस पथकाच्या गाडीवर कोसळलं झाड; एपीआय सह चालकाचा मृत्यू, 3 जण गंभीर

0
2
पोलीस पथकाच्या गाडीवर कोसळलं झाड; एपीआय सह चालकाचा मृत्यू, 3 जण गंभीर

साईमत जळगाव प्रतिनिधी

 एरंडोल-कासोदाकडे जात असताना एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्री पावणे ९ वाजेच्या सुमारास झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात गाडीमधील इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना  बाहेर काढण्यात आले.
अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी पोहचले,  आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here