पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
2

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नाही अथवा इतरत्र दुसरीकडे कुठे मिळूनही आली नाही. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here