शेकडो कोटींच्या निधीचे कामे करूनही जळगाव खड्डेमय

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील नागरिकांच्या रस्त्यांच्या समस्या लक्षात घेता आमदारांसह मंत्री महोदयांनी शेकडो कोटी रुपयांची निधी शहराच्या विकासासाठी मंजूर केला होता. कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची असावी, यासाठी मनपा हद्दीतील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. शेकडो कोटी रुपयांची कामे झाली. प्रत्यक्षात मात्र झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून खड्डेमय जळगाव असे चित्र सर्वदूर पहावयास मिळत आहे. उपविभागीय अभियंता गिरीश सूर्यवंशी यांची गुणवत्तेची कामे करून घेण्याची जबाबदारी असतानाही फक्त आपल्या आर्थिक हव्यासापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी खड्ड्यात टाकण्याचे काम यांनी केले आहे. असे असतानाही कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या जवळचे असल्याने फक्त आर्थिक मलिदा लाटण्यात ते मग्न असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील कानाकोपऱ्यातील रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला होता. रस्त्यांची कामे गुणवत्तेची व्हावी, म्हणून मनपा हद्दीतून काढून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. सत्य स्थितीत मात्र झालेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे चित्र समोर दिसत आहे. जळगाव शहर पुन्हा पूर्वीसारखे खड्डेमय दिसत आहे. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून उपविभागीय अभियंता मात्र मालामाल झाले असल्याचे चित्र समोर आहे. जळगाव उपविभाग नंबर १ यांच्या कडील सर्वच झालेली कामे गुनावात्त हीन झालेली आहेत. तरीही कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या मांडीवर बसून मलई खाणाऱ्या या बहाद्दराकडे कोण कसे वक्रदृष्टीने बघणार? अशी खुली आम चर्चा शहरात सर्वदूर रंगली आहे.

शाखा अभियंता ते उपविभागीय अभियंत्याचा जळगावातच मुक्काम

जळगावात एक नंबर उपविभागात वर्षानुवर्ष शाखा अभियंता म्हणून मलिदा लाटणाऱ्या या अधिकाऱ्याने उपविभागीय अभियंता म्हणून थेट मंत्र्यांना मॅनेज करून जळगाव एक नंबर उपविभागाचा कार्यभार मिळवला आहे. सर्वांना मॅनेज करण्यात माहिर असलेल्याया उपविभागीय अभियंत्याने मात्र त्याच्या अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता खूपच ढासाळली आहे. कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांची मर्जी जिंकल्याने हा प्रताप होत असल्याची इतर शाखा अभियंत्यांचे खुलेआम म्हणणे आहे. दरम्यान, अभियंत्याच्या प्रतापाकडे शहरासह सा.बां विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here