भुसावळात तापी काठी आढळले मृत अर्भक

0
3

साईमत भुसावळ प्रतिनिधी

शहरातील तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ तीन दिवसीय पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. मृत अर्भक तापीच्या पाण्यात वाहून आले असावे किंवा अज्ञात मातेने आणून टाकले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.

तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील मोकळ्या जागेत पुरूष जातीचे तीन दिवसीय बालकाचे मृत व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याप्रकरणी सोनी सपकाळे (२९, भिलवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फिरोज रज्जाक तडवी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here