साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील प.न.लुंकड कन्याशाळेच्या इ.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना चांडक कॅन्सर हॉस्पिटलात मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या ५०० विद्यार्थिनींनी मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. यावेळी लसीकरण ठिकाणी लस घ्यायला जाण्यासाठी शाळेतूनच चांडक कॅन्सर हॉस्पिटलतर्फे वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. लस घेणे ऐच्छिक असल्यामुळे पालकांच्या संमतीने विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
Author: Saimat
साईमत, नाशिक: प्रतिनिधी पेठ मार्गावरील अपघातप्रवण कोटंबी घाटातील वळणावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. ही वाहने आपसात धडकल्याने वाहतूक बंद पडली आहे. सततच्या पावसामुळे या मार्गावरील सावळघाट व कोटंबी घाट वाहनांसाठी धोकादायक झालेले असतानाच शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नाशिककडे जेसीबी घेऊन जाणारा ट्रक आणि पेठकडे येणारा आयशर ट्रकवर जेसीबी उलटला. दोन्ही वाहनांवर टँकर धडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातामध्ये सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी रक्तदानाचे समाजात महत्त्व वाढले पाहिजे. यामुळे नागरिक स्वतःहून उस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. यासाठी समाजात रक्तादानाविषयी जाणीव जागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा रेडक्रास सोसायटीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी गुरुवारी येथे केल्या. जळगाव जिल्हा रेडकॉस सोसायटीचे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला रेडकॉस सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, समुपदेशनाच्या गरजा समजून घेण्यासाठी रेड क्रॉस सदस्यांनी तुरुंग अधीक्षकांची भेट घ्यावी. नवीन सदस्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी अध्यक्षासह 6 सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी. सोसायटी परिसरात मासिक रक्तदान मोहीम आयोजित करण्यात यावी . नियोजित दिवशी रक्तदान करण्यासाठी विविध संस्थांना प्रवृत्त करावे, असा सूचनाही…
साईमत प्रतिनिधी जळगाव येथील सराफ बाजारातील राजमल लखीचंद अर्थात आर. एल. ग्रुपवर गुरुवारी सकाळी 8 वाजता ईडी तथा सक्तवसुली संचलनालयाची धाड पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सकाळी ईडीच्या पथकाने छापा टाकून तपासणी करण्यास प्रारंभ केला. त्यांची तपासणी सायंकाळपर्यत सुरू होती. मात्र या ग्रुपच्या पेढीसमोर पथकातील दोन चारचाकी वाहने लागलेली दिसून आली. याबाबत अधिकृत माहिती मात्र समूहातर्फे कोणीच दिली नाही. पथक आतमध्ये तपासणी करत असल्याचे ‘साईमत’च्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता दिसून आले. या फर्मचे सर्व दरवाजे बंद करून आतमध्ये तपासणी होत असल्याचे निदर्शनास आले .कामावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यामुळे कर्मचारी जुन्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसलेले होते.
साईमत, प्रतिनिधी, जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी 5 वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उमाळा येथील बसस्थानकाजवळ बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 3768) या प्रवाशी रिक्षाला भरधाव कार क्रमांक (एमएच 02 बीआर 4391) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (वय 45) यांचा मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षासह…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एकाची दुचाकी लांबवणाऱ्या चौघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी केलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (वय 43) यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीएल 3032) ही घरासमोरून चोरट्यांनी 21 मे रोजी रात्री 11 वाजता चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जळगाव-स्वातंत्र्यदिनानिमित्त बागबान विकास फाउंडेशन व एल्गार संघटनेतर्फे विराट कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंगळवारी क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शरीफ बागवान तर दंगल उद्घाटन डॉ. शांताराम सोनवणे यांनी केले. पहिली कुस्ती नायब तहसीलदार पंकज लोखंडे व नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर यांच्या हस्ते लावण्यात आली. तर मोठी कुस्ती शहर निरीक्षक अनिल पवार यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली. तर मुलींची कुस्ती डॉ. शांताराम सोनवणे यांच्या हस्ते लावण्यात आली होती. महाराष्ट्रातील नामाकिंत पहिलवानांनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली होती. सर्व सहभागींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले तर विजेत्यांना ढाल चषक व रोख रक्कम…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जळगाव व राव्ोर लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणीही त्यांनी लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना केल्या. सद्यस्थितीत जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. राव्ोर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे, तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे ४ आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील व लता सोनावणे यांचा यात समाव्ोश होता. पण सध्या हे चौघेही िंशदे गटात गेलेत. त्यामुळे आता या जागांवर नव्ो उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभा…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था ओणम आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना व्ोळेपूर्वी पगार आणि पेन्शन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच हा पगार आणि निवृत्ती व्ोतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयाने कार्यालयीन निव्ोदनात म्हटले की केरळमधील केंद्र सरकारी कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी त्यांचे ऑगस्टचे व्ोतन काढू शकतात. तर महाराष्ट्रात केंद्र सरकारी कर्मचारी सप्टेंबरचे व्ोतन २७ सप्टेंबरपर्यंत काढू शकतात.ओणम हा केरळ येथील लोकप्रिय सण आहे, तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच सरकारने बँका,पीएओना राज्यांमधील सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचे पेन्शन त्याच दिवशी वितरित करण्यास सांगितले आहे.
साईमत, मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक लोकसभा,विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आता महिनाभरात सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक ‘वॉर रुम’ सुरू करण्यात येणार आहे. भाजपकडून जे मतदारसंघ शिवसेना (िंशदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांसाठी सोडल्या जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख राहतील आणि या ‘वॉर रुम’चा त्यांनाही उपयोग होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांनाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे ज्या जागा सहकारी पक्षांकडे जातील,तेथे त्यांना भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. भाजपने पुढील…