जळगाव, रावेर लोकसभा आणि विधानसभेच्या ११ मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करा

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जळगाव व राव्ोर लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणीही त्यांनी लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना केल्या.

सद्यस्थितीत जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. राव्ोर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे, तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे ४ आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील व लता सोनावणे यांचा यात समाव्ोश होता. पण सध्या हे चौघेही िंशदे गटात गेलेत. त्यामुळे आता या जागांवर नव्ो उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत ते दररोज व्ोगव्ोगळ्या लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. त्यांना भेटत आहेत. गुरुवारी मातोश्रीवर त्यांनी नगर आणि जळगाव जिल्ह्याचा आढावा घेतला.

दरम्यान, अहमदनगर दक्षिण मतदार संघात महाविकास आघाडीने कोणताही उमेदवार दिला तरी आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे रहायचे. त्या उमदेवाराला साथ द्यायची. आपल्याला सुजय विखे पाटलांचा पराभव करायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here