साईमत, प्रतिनिधी, जळगाव
येथील प.न.लुंकड कन्याशाळेच्या इ.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना चांडक कॅन्सर हॉस्पिटलात मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या ५०० विद्यार्थिनींनी मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. यावेळी लसीकरण ठिकाणी लस घ्यायला जाण्यासाठी शाळेतूनच चांडक कॅन्सर हॉस्पिटलतर्फे वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. लस घेणे ऐच्छिक असल्यामुळे पालकांच्या संमतीने विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.