Author: Saimat

साईमत, मुंबई : प्रतिनिधी गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. हा शिधा १०० रुपयात वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समाव्ोश असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जाव्ो, यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी देखील आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. घाईत सरकारने एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी व्ोळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या…

Read More

साईमत, नंदूरबार : प्रतिनिधी भरधाव व्ोगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वाराला ट्रक चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नंदुरबार रस्त्यावर सदर अपघात शुक्रवारी सकाळी घडला. शहादा नंदुरबार मार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला भरधाव व्ोगाने जाणाऱ्या ट्रकने फरफटत नेले. यात शहादा येथील मुसेब तेली या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला…

Read More

साईमत धुळे । प्रतिनिधी येथील नंदिनी रवींद्र खैरनार(धोबी) वय 24, ह.मु. साईदर्शन कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे हिने गुरुवारी (ता. 17) दुपारी बाराच्या सुमारास दभाशीजवळ तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिला उडी मारताना काही मासेमारी करणाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिला बाहेर काढले. मात्र ती मृत झाली होती. तिचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्यानंतर पानसेमल (मध्य प्रदेश) येथील मामाने तिचे छायाचित्र पाहिले. तेव्हा नंदिनीबाबत उलगडा झाला. माहिती मिळताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.नंदिनीने नुकतीच सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडील रवींद्र सुकदेव खैरनार लॉन्ड्री व्यवसाय करतात. गरिबी असूनही मोठ्या मेहनतीने तिला सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. गेल्या महिन्यापासून ती…

Read More

साईमत नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला आता यश मिळाले असून जिल्हा अमली पदार्थ मुक्त झाला आहे. त्याची घोषणा नाशिक विभागाचे विशेष पोलीस अधीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सात हजार विद्यार्थ्यांनी एकाच व्ोळी अंमली पदार्थ मुक्त शपथ घेतली. राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सोशल पोलिसिंग करून शाळा महाविद्यालयात जनजागृती केली. गावागावात जाऊन ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून गावागावात जनजागृती केली. त्यातून जिल्हा अमली पदार्थ मुक्त जिल्हा…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी आरोग्याच्या कोणत्याही सोयी सुविधा नसताना अनुभवाच्या जोरावर वयाच्या 90 वर्षात हजार बाळंतपण सुखरुप करण्याची किमया कापडणे येथील फुलाबाई झाल्टे यांनी केली. त्याचा विविध कार्यकारी संस्थेने स्वातंत्र्यदिनी ‘भुलेक पुरस्कार’ देवून सन्मानीत केले. आरोग्याच्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. शासन जनतेच्या आरोग्याची मोठी काळजी घेत आहे. महिलांचे बाळंतपण म्हणजे बाळासह आईचा पुनर्जन्मच असतो. बहुतेक बाळंतपणे रुग्णालयातच होत आहेत. ज्या काळी या सुविधा नव्हत्या तेव्हा फुलाबार्इंनी एकहाती हजारावर बाळंतपणे केली. सुईणपण निभावताना एकही बालक दगावले नाही. फुलाबाई दिसल्यावर त्यांना नतमस्तक होणारी शेकड्यावर तरुण आहेत. या फुलाबार्इंना वयाच्या नव्वदीत ‘भुलेक सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. येथील फुलाबाई झाल्टे यांचे वय…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी आयर्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या टी२० सामन्याच्या एक दिवस अगोदर जसप्रित बुमराह म्हणाला, जेव्हा दुखापत बरी होण्यास व्ोळ लागतो तेव्हा तो काळ हा खूप निराशाजनक असतो. मी स्वतःवर शंका घेण्याऐवजी तंदुरुस्त कसे व्हाव्ो आणि पुनरागमन कसे कराव्ो याचा विचार अधिक करत होतो. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण १० षटके टाकण्यासाठी शरीराला व्ोळ आणि आराम देणे महत्त्वाचे होते. मी याला कधीही वाईट टप्पा म्हणून घेतले नाही. माझं करिअर संपलं असे मला एकदाही वाटलं नाही. मी या सर्व काळात माझ्या परिस्थितीवर उपाय शोधत होतो आणि जेव्हा उपाय सुचला तेव्हा माझ्या डोक्यातील विचार कमी झाले. व्ोगवान गोलंदाज जसप्रीत पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही…

Read More

साईमत, दुबई ः वृत्तसंस्था एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याव्ोळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, भारताच्या कामगिरीचे प्रमुख कारण देशातील मीडिया आहे, जे संघावर दबाव आणते. याच दबावामुळे २०२१ साली भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. शोएब अख्तरने रेज स्पोर्ट्‌सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय मीडिया आपल्या खेळाडूंची काळजी करत नाही. ते त्यांच्यावर खूप दबाव टाकतात जे चुकीचे आहे. रावळिंपडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणाला, मी मीडियाच्या लोकांना सांगू…

Read More

साईमत, अयोध्या ः वृत्तसंस्था राम मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या रामभक्तांनाही योग्य तो सन्मान दिला जावा, यावर ट्रस्टच्या बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. काही सदस्यांनी या राम भक्तांच्या मूर्ती ठिकठिकाणी बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर काहींनी अयोध्येतील रस्त्यांना आणि चौकांना त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एका हिंदी दैनिकाने वृत्त दिले आहे. मंदिर आंदोलनात किती राम भक्तांना जीव गमवावा लागला, याची नेमकी संख्या माहीत नाही. जवळपास पाचशे वर्षे चाललेल्या राम मंदिर आंदोलनात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. १९९० च्या दशकापूर्वी आंदोलनात प्राण गमावलेल्या रामभक्तांची अचूक माहिती मिळणेही कठीण होऊ शकते. त्यांची संख्या देखील खूप जास्त असू शकते आणि…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील लॉर्ड गणेशा स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय शासकीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्ष मुले गटात दादासाहेब अ.चि. पाटील माध्यमिक विद्यालय, रोटवद तर १७ वर्ष मुले गटात नि. प. पाटील, पळासखेडा मिराचे विजयी ठरले आहेत. स्पर्धेत जामनेर तालुक्यातून १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌‍‍घाटन लॉर्ड गणेशा स्कूलचे प्रशासकीय संचालक सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटवद अ. चि.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.ए.पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, विकास पाटील, डी.आर.चौधरी, हरिभाऊ राऊत,…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी येथील गोकुळधाम सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ नगरात आ.राजूमामा भोळे यांच्या आमदार निधीतून हायमास्टचे लोकार्पण परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विकी जगदाळे, किरण लाडवंजारी, योगेश सपकाळे, हेमंत मंडोले, विशाल जगदाळे, भीमराव सुरदास, गोविंदा शुक्ला, सचिन माळी, महेंद्र उदमले आदींची होती.  रस्ते काँक्रिटीकरणाचे आश्वासन वृक्षारोपणा संदर्भात सुनील वाणी यांनी महत्त्व विशद केले. वृक्ष नागरिकांना पाहिजे असल्यास ते मोफत आम्ही पुरवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निराकरण करू. तसेच या भागातील रस्ते काँक्रिटीकरण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी कॉलनीतील रहिवासी पंकज…

Read More