जळगावच्या आर.एल. समूहावर ईडीची धाड

0
25

साईमत प्रतिनिधी जळगाव

येथील सराफ बाजारातील राजमल लखीचंद अर्थात आर. एल. ग्रुपवर गुरुवारी सकाळी 8 वाजता ईडी तथा सक्तवसुली संचलनालयाची धाड पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सकाळी ईडीच्या पथकाने छापा टाकून तपासणी करण्यास प्रारंभ केला. त्यांची तपासणी सायंकाळपर्यत सुरू होती. मात्र या ग्रुपच्या पेढीसमोर पथकातील दोन चारचाकी वाहने लागलेली दिसून आली. याबाबत अधिकृत माहिती मात्र समूहातर्फे कोणीच दिली नाही.

पथक आतमध्ये तपासणी करत असल्याचे ‌‘साईमत‌’च्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता दिसून आले. या फर्मचे सर्व दरवाजे बंद करून आतमध्ये तपासणी होत असल्याचे निदर्शनास आले .कामावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यामुळे कर्मचारी जुन्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसलेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here