चोरीच्या दोन दुचाकींसह चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
2

साईमत, प्रतिनिधी, जळगाव
तालुक्यातील शिरसोली येथील एकाची दुचाकी लांबवणाऱ्या चौघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी केलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (वय 43) यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीएल 3032) ही घरासमोरून चोरट्यांनी 21 मे रोजी रात्री 11 वाजता चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भील, किरण गोपाळ भील, मयुर किशोर बारी आणि सौरव राजू सोनवणे सर्व रा. शिरसोली यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या दोन दुचाकी आणि शाळेतून चोरलेले साहित्य काढून दिले.

याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. छगन तायडे, किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here