स्वातंत्र्यदिनी शिवाजीनगरात रंगला कुस्तीचा आखाडा

0
2

साईमत, प्रतिनिधी, जळगाव
जळगाव-स्वातंत्र्यदिनानिमित्त बागबान विकास फाउंडेशन व एल्गार संघटनेतर्फे विराट कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंगळवारी क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे करण्यात आले  होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शरीफ बागवान तर दंगल उद्घाटन डॉ. शांताराम सोनवणे यांनी केले.

पहिली कुस्ती नायब तहसीलदार पंकज लोखंडे व नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर यांच्या हस्ते लावण्यात आली. तर मोठी कुस्ती शहर निरीक्षक अनिल पवार यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली. तर मुलींची कुस्ती डॉ. शांताराम सोनवणे यांच्या हस्ते लावण्यात आली होती. महाराष्ट्रातील नामाकिंत पहिलवानांनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली होती.  सर्व सहभागींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले तर विजेत्यांना ढाल चषक व रोख रक्कम देण्यात आली. सर्व उपस्थितांचे आभार आयोजक बागबान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here