केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लवकर पगार

0
3

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ओणम आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना व्ोळेपूर्वी पगार आणि पेन्शन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच हा पगार आणि निवृत्ती व्ोतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयाने कार्यालयीन निव्ोदनात म्हटले की केरळमधील केंद्र सरकारी कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी त्यांचे ऑगस्टचे व्ोतन काढू शकतात. तर महाराष्ट्रात केंद्र सरकारी कर्मचारी सप्टेंबरचे व्ोतन २७ सप्टेंबरपर्यंत काढू शकतात.ओणम हा केरळ येथील लोकप्रिय सण आहे, तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच सरकारने बँका,पीएओना राज्यांमधील सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचे पेन्शन त्याच दिवशी वितरित करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here