Author: Saimat

साईमत, जळगाव, प्रतिनिधी जागतिक व्यावसायिक बदलामुळे शैक्षणिक बदल घडून आले आहेत. पारंपरिक शिक्षण आणि नोकरी या पलीकडे जाऊन नवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत. या नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधीत विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. तुमचे कौशल्य आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालून तुम्ही शिक्षणक्रम पूर्ण केला तर भविष्यात या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी प्राप्त होतात. तसेच उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसायाच्या संकल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि त्याचा विस्तार करणे इतकाच नव्हे, तर जगावेगळा विचार करून आपले उत्पादन जगातील सर्वश्रेष्ठ उत्पादन बनवणे हा होय, असे प्रतिपादन  मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ.…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी  जिल्हा आपत्ती निवारण आराखडा तयार करून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवत तात्काळ उपाययोजनासह आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी येथे दिल्या. जिल्हा आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ.प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ, चंद्रकांत गवळी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी  प्रसाद म्हणाले की, 15 व्या वित्त आयोगाद्वारे राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करणेसाठी निधी मंजुर केलेला…

Read More

साईमत,  जळगाव, प्रतिनिधी केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांना इन्होवेशन आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी लागणारी एडव्हॉन्स ट्रेनिंग त्यांना मिळावी, तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी आयएमआर आणि जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो-जिफ) यांच्यासोबत आज एक करार करण्यात आला. इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्चच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे आणि जीतो इंटरनेशनल इनक्यूबेशन फाउंडेशनचे गव्हर्नर भरत ओसवाल यांच्या स्वाक्षरीने हा करार संपन्न झाला . यावेळी मंचावर इंस्टीट्यूटच्या वतीने डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे, प्रा. पुनीत शर्मा तर जीतो-जीफच्या वतीने जीतो जळगाव युवा शाखाचे अध्यक्ष हरक सोनी, सचिन चोरडिया आणि निखील कोठारी…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील बळीरामपेठतील भाजप कार्यालयात महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या उपस्थितीत शहर मतदार चेतना अभियानाच्या प्रमुखासह कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. बळीरामपेठेतील भाजपा कार्यालयात भाजपा महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षेखाली शहर मतदार चेतना अभियानाची बैठक घेण्यात आली. या अभियानाच्या प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापूरे तर युवा मोर्चा अध्यक्षपदी आनंद सपकाळे यांच्या निवडीची घोषणा कण्यात आली. 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत मतदार चेतना अभियान राबविण्यात येणार आहे. यात नवमतदार नोंदणी, विदेशात असलेल्या मतदारांची नोंदणी, मतदार यादी आधारकार्ड जोडणे, दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळणे, याबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान शहरातील मंडळनिहाय राबविण्यात येणार आहे. त्यामुळे…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एकाने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एकाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता अश्लील चाळे करत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  रिझर्व बँकेच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ च्या मंजुरीनुसार आपल्या दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेमध्ये अकोला मर्चंट कोऑप. बँकेचे विलीनीकरण होत आहे. यामुळे दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून अकोला मर्चंट को ऑप. बँकेच्या अकोला व अकोट या शाखा जळगाव पीपल्स को ऑप बँकेच्या शाखा म्हणून कार्य करतील. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून, फक्त सक्षम बँकेस अन्य बँक विलीन करण्याची परवानगी देण्यात येते. सहकार क्षेत्राप्रती ग्राहकांचा विश्वास कायम राहावा या उदात्त हेतूने बँकेने अकोला मर्चंट कोऑप बँकेचे सक्षमपणे विलीनीकरण करुन घेतलेले आहे. जळगाव पीपल्स बँकेसारख्या सक्षम बँकेत विलीन झाल्याने अकोला मर्चंट बँकेच्या सभासद, ठेवीदारांचा आर्थिक व्यवहार अबाधीत व सुरक्षित…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सोशल मीडियाची बैठक शनिवारी नाशिक येथे पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी जळगावच्या पंकज गजानन वाघ यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी यावेळी सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे उपस्थित होते.

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हाव्ो, या माध्यमातून जनतेचे प्रबोधन कराव्ो, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही जपत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी सार्वजनिक गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखाव्ो साकार करून सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून मताधिकार बजावण्यासाठी मतदान नोंदणी, मताधिकारी, लोकशाहीचे…

Read More

साईमत, शहादा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपरी येथील एका फॅक्टरी मालकाला धनादेश अनादरप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांनी तीन व्ोगव्ोगळ्या प्रकरणात एकूण ५९ लाख रुपये दंड व एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालाने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे. पिंपरी येथील सिल्वर पॅक सोल्युशन या पॅकिंग पट्ट्या बनविण्याच्या फॅक्टरीचे प्रोप्रायटर नंदकुमार अशोक पाटील (रा.म्हसावद ता.शहादा) यांनी आपल्या फॅक्टरीतील विविध बांधकामासाठी म्हसावद ता. शाहदा येथील महावीर कृषी सेवा केंद्र या प्रतिष्ठानातून सन २०१४ मध्ये व्ोळोव्ोळी सुमारे ३२ लाख रुपयांचे लोखंड, तार, सिमेंट आदी साहित्य उधारीने खरेदी केलेले होते. ती उधारी चुकती करण्यासाठी त्याच वर्षी नंदकुमार पाटील यांनी…

Read More

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी तालुक्यातील भोणे येथील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. तालुक्यातील भोणे येथे उभारण्यात आलेल्या सुझलॉन कंपनीच्या टॉवरवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कंत्राटदाराकडून मेंटेनन्सचे काम सुरु होते. याव्ोळी एक मजूर विनासुरक्षा टॉवरवर चढला. मात्र, त्याचा अचानक तोल गेल्याने तो सरळ जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Read More