दि जळगाव पीपल्स को ऑप. बँकेमध्ये अकोला मर्चंट को ऑप बँकेचे विलीनीकरण

0
3

साईमत, प्रतिनिधी, जळगाव 

रिझर्व बँकेच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ च्या मंजुरीनुसार आपल्या दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेमध्ये अकोला मर्चंट कोऑप. बँकेचे विलीनीकरण होत आहे. यामुळे दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून अकोला मर्चंट को ऑप. बँकेच्या अकोला व अकोट या शाखा जळगाव पीपल्स को ऑप बँकेच्या शाखा म्हणून कार्य करतील.

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून, फक्त सक्षम बँकेस अन्य बँक विलीन करण्याची परवानगी देण्यात येते. सहकार क्षेत्राप्रती ग्राहकांचा विश्वास कायम राहावा या उदात्त हेतूने बँकेने अकोला मर्चंट कोऑप बँकेचे सक्षमपणे विलीनीकरण करुन घेतलेले आहे. जळगाव पीपल्स बँकेसारख्या सक्षम बँकेत विलीन झाल्याने अकोला मर्चंट बँकेच्या सभासद, ठेवीदारांचा आर्थिक व्यवहार अबाधीत व सुरक्षित झालेला आहे. यापुर्वी दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेने धुळे अर्बन को-ऑप. बँकेचे त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसह आपल्या बँकेत यशस्वीरित्या

विलिनीकरण करुन घेतले, यातुन बँकेने सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता जपली.
विद्यमान चेअरमन अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच चेअरमन-व्यवस्थापन मंडळ व संचालक भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने यशस्वितेचा आणखी एक टप्पा पार केला .

बँकेच्या जळगाव, धुळे, नासिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, मलकापुर, बुलढाणा, कोल्हापुर, अमरावती, नंदुरबार, बुरहानपुर-मध्यप्रदेश येथे ४० शाखा असून आता अकोला मर्चंट बँकेचे विलीनीकरण केल्यामुळे आता अकोला व अकोट या शाखांचाही समावेश झाला आहे. सदर सर्व शाखांमध्ये बँकेचा व्यवहार जगविख्यात इन्फोसिस कंपनीच्या फिनॅकल सॉफ्टवेअरवर कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here