साईमत, प्रतिनिधी, जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर येथील सातवेीच्या विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील शेती प्रकल्पास प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीचा उद्देश व्यावहारिक उद्योजकीय कौशल्यांवर अनुभवात्मक आणि संदर्भीत समज विद्यार्थ्यांना प्रदान करणे हा होता. याशिवाय या प्रकल्पाचे उद्दिष्ट शेती उद्योजक उपक्रमाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा होता. प्रकल्प भेटीमध्ये जाण्यापूर्वी, विद्यार्थ्यांचे जी.आर. पाटील यांनी स्वागत केले. शेती व त्यावर आधारित उद्योगाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितली. जैन व्हॅलीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या जीवनाचा लेखाजोखा तसेच त्यांचा शेती करण्यापासून ते शेती मालावर प्रक्रिया उद्योग चालू करण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. पारंपरिक शेती व आधुनिक शेती यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून सक्रीय सहभाग घेतला.…
Author: Saimat
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड.प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले,व्यवस्थापन सदस्य भालचंद्र पाटील , भरत अमळकर ,डॉ. हर्षवर्धन जावळे ,डॉ.शिल्पा बेंडाळे, प्रा.अशोक राणे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, प्रा.अनिल राव ,रुपेश चिरमाडे,संजय प्रभुदेसाई हे मंचावर उपस्थित होते. चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिनंदनचा ठराव यावेळी करण्यात आला. साहेबराव भुकन यांच्या ‘विनोबा आणि शिक्षण’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गद्य लेखन कर्मवीर भाऊराव पाटील राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कोषाध्यक्ष…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतिंसह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतिंसह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही व्ोळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असे मिश्किल विधानही त्यांनी केलं आहे. भगतिंसह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही व्ोळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच,…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात तीन राजकीय भूकंप झाले. आता भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षात मोठी फूट घडून येणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातत्याने चर्चा होत असते. पण महाजन यांनी उघडपणे याबाबतचे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागले आहे. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवलं आहे, असे विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.. राज्यातील सरकारमध्ये सगळे पक्ष…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी देशात कांद्याची उपलब्धता कमी असून पावसाअभावी पुढील वर्षी उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे उपलब्ध कांदा देशात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा भाव इतके गगनाला भिडतील की, आजवरचे विक्रम मोडीत निघतील. मागे दिल्लीकरांना कांद्याने रडवले होते. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांचे हित डोळय़ासमोर ठेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू केल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विविध राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. कांद्याला निर्यात शुल्क लागू झाल्यापासून स्थानिक पातळीवर पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडणे व आंदोलनांद्वारे केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सायंकाळी महाजन यांनी येथे…
साईमत, आडगाव ः प्रतिनिधी येथील प्रवीण नामदेव पवार यांच्या उसाच्या शेतात बिबट्या व त्याचे दोन बछडे आढळले. प्रवीण पवार यांचा मुलगा शिवप्रसाद ऊर्फ सोमनाथ हा शुक्रवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास उसाच्या शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याचे लहान दोन बछडे आढळले. शिवप्रसाद हा कामात व्यस्त असताना बिबट्याने डरकाळी फोडली व त्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कसाबसा जीव वाचवत शेताबाहेर येऊन इतरांना माहिती दिली. दरम्यान, ग्रामस्थ येईपर्यंत मादी एका पिलाला घेऊन पसार झाली. दुसरे पिल्लू मात्र तेथेच असून, त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. खान्देशात सर्वत्र दमदार पाऊसच झाला नाही. त्यामुळे पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी लावलेली पिके जगवायची तरी कशी, असा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील खान्देशातील तिनही जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दुसरीकडे खरीप हंगामाची पिके देखील धोक्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आली असून, पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. आठवडाभरात ३ हजार ३०० रुपयांनी भाव वाढला आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची…
साईमत, बंगळुरू : प्रतिनिधी चांद्रयान-३ टीमच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ कौतुकाने थोपटली. पंतप्रधान जेव्हा कमांड सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा शास्त्रज्ञांनी ५ मिनिटे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. इस्रो प्रमुखांनी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरल्याचे चित्र पंतप्रधानांना सादर केले. चांद्रयान-३ चे मॉडेल देऊन सन्मान केला. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचे बंगळुरूतील मुख्यालय…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या गीतांवर आधारित “हिरवाई अन् निळाई जगलेले..” या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात दि. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आलेले आहे. महानोर हे गीतकार असलेल्या जैत रे जैत या चित्रपटातील सुमधुर गीतांचं गारुड आजही मराठी मनावर अधिराज्य करीत आहे. अशा या रानकवींना त्यांनी रचलेल्या कविता व अजरामर गीते गाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाशी एकरूप झालेल्या या महाकवींच्या हृद्य आठवणी व गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे. ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले,…