Author: Saimat

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पशुधनामध्ये लंपी स्किन डिसीज या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, परिवहन आणि गृह विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी दिले आहेत. लंपी स्किन डिसीज या साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नुकतीच संपन्न झाली, त्याव्ोळी त्या बोलत होत्या. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त डॉ. मनोज पावरा, जिल्हा…

Read More

साईमत,धुळे : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाव्ो यासाठी ‘भविष्यव्ोधी शिक्षण प्लस’ नावाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरणात या उपक्रमाचा समाव्ोश करण्यात आला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, धुळे, योजना शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक व जिल्हा गुणवत्ता आढावा तसेच एकदिवसीय शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

साईमत, तळोदा : प्रतिनिधी जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर बिबट्या व त्याच्यासोबत असलेल्या बछड्यांनी हल्ला केल्याची घटना दलेलपूर (ता. तळोदा) येथे गुरुवारी दुपारी घडली. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या सुदैवाने पाळलेल्या म्हशींनी बिबट्या व त्याच्या बछड्यांच्या प्रतिकार करीत, त्यांना हुसकावून लावले. मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे प्राण वाचले असून, या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. तळोदा शहरातील कॉलेज रोड परिसरात बादशाह अर्जुन भरवाड राहत असून, त्यांच्या मालकीच्या म्हशी व गायी आहेत. त्यांना चारण्यासाठी ते परिसरातील विविध भागांमध्ये नेहमीच जात असतात. गुरुवारीदेखील ते नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारातील डिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात म्हशी नेल्या होत्या. दरम्यान, त्या ठिकाणी आधीच दबा…

Read More

साईमत, शहादा: प्रतिनिधी कोठली (ता. शहादा) येथील मनीषा राजेंद्र पाटील यांच्या राहत्या घरात तीन चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रव्ोश करत सुमारे 75 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी (ता. 24) रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वारंवार होणाऱ्या चोरीच्या तसेच दरोड्याच्या घटनांमुळे सारंगखेडा पोलिसांपुढे दरोडेखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. कोठली त.सा. येथील घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मनीषा राजेंद्र पाटील (वय 47) घरात एकट्या असताना बुधवारी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान चोरटे घराच्या मागील दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून आत घुसून 60 हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे सोन्याचे दागिने…

Read More

साईमत, नंदूरबार : प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांतील लोकांना बॅकवॉटर मधून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु आता नर्मदा काठावरील आदिवासींचा हा जीवघेणा प्रवास थांबणार आहे. बिलगाव पुलासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक नर्मदा नदीच्या पलीकडे राहत असून या नागरिकांना जाण्यासाठी बिलगाव येथे जाण्यासाठी पूल तयार करण्यात येत होता. मात्र हा पूल गेल्या अनेक वर्षापासून अपुऱ्या अवस्थेत होता. यामुळे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 10 ते 12 गावांना येण्या जाण्यासाठी सोय नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर जीव धोक्यात घालून नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून प्रवास करावा लागत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून…

Read More

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी जिल्ह्यासह शहरात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. दूध भेसळ विरोधी पथकाने नंदुरबार शहरात 18 ठिकाणी तपासणी केली. यामध्ये नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने भेसळयुक्त 334 लिटर दूध नष्ट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हा दुग्ध विकास आणि व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच नंदुरबार शहरातील विविध दूध विक्रेत्यांची तपासणी सुरू केली.या पथकाने 18 ठिकाणी तपासणी केल्यानंतर नऊ दूध विक्रेत्यांकडे दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 334 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुधाचे नमुने…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांचा गौरी-गणपती उत्सव तसेच दिवाळी सण गोड होणार असून, जिल्ह्यातील तब्बल सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होईल.गौरी-गणपती उत्सवानिमित्त 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा संच वितरित होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा समाव्ोश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य…

Read More

साईमत, नाशिक । प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल सुरु करावा, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निव्ोदनाद्वारे केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसॲप, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन खरेदी, विविध कर्ज योजनांद्वारे नागरिकांची फसवणूक होत असते. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्हास्तरावर सायबर सेल कार्यान्वित आहेत. या सेल मध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या विचारात घेता सायबर सेलमधील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे फसवणुक केलेल्या गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्यांच्या तपास कार्यात विलंब…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिक पोलीस सायबर दूतांच्या नेमणुकीसह शहरभर चौक बैठका आयोजित करत आहे. मात्र दुसरीकडे खुनाचे सत्र सुरूच असून अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस चौकीच्या काही अंतरावरच भाजीविक्रेत्याला संपविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अंबड भागात एका सराईत गुन्हेगाराला टोळीवादातून संपविण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरात भरदिवसा नागरिकांच्या गर्दीत एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. तर पोलिसही वारंवार घडणाऱ्या घटनांनी चक्रावले असून एक गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच दुसरी…

Read More

साईमत, त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी सनशाईन इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी तर्फे ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ कार्यक्रम दुबई येथे उत्साहात संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ब्यूटी सेमिनार अंतर्गत इंटरनॅशनल लंडन कॉलेज येथे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या 18 महिला या ब्यूटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल या प्रशिक्षणाचे नियोजन नासिकच्या विनि कौर राजपूत यांनी केले. या सर्व महिला भारतातील विविध राज्यांमधुन सहभागी झाल्या होत्या. यामधे मीना सूर्यवंशी मध्य प्रदेश, तेजल जगदाळे गुजरात, रोहीनी ठोबे पुणे तर अर्चना म्हस्के, जागृती अव्हाड, दिव्या पाटील, वैष्णवी सोनवणे, कल्पना गरुड, वैशाली नाईक, रोहिणी संतोष ठुबे, प्राची तिवडे नासिक आदी महिलांचा समाव्ोश होता. नासिकच्या ज्योति कमलेश शिंदे यांनी ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक…

Read More