साईमत, प्रतिनिधी, जळगाव पत्रकारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रव्यापी संघटनेने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी केलेल्या आंदोलनाची दखल घेत आमचे म्हणणे राज्य सरकारपर्यंत सादर करण्याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पत्रकारांच्या अशा आहेत मागण्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये १० वर्षे पूर्ण झाली, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.) राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिकांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष…
Author: Saimat
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याअंतर्गत ५१ हजारांहून अधिक तरुणांना जॉईिंनग लेटर दिले. याव्ोळी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरिंन्सगद्वारे तरुणांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, भारत लवकरच टॉप-३ अर्थव्यवस्थेत सामील होईल. देशाचे रक्षक बनणे हे देशातील प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे. ९ महिन्यांत ४.८४ लाख बेरोजगारांना नियुक्ती २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पीएम म्हणाले होते – २०२३ च्या अखेरीस देशातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी गेल्या ९ महिन्यांत ७ रोजगार मेळ्यांमध्ये ४ लाख ४८ हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हाभरात व्ोगव्ोगळ्या पोलीस ठाण्यात घरफोड्या, चोरी आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे नेतृत्व एखादी महिला गुन्हा करते आणि तिच्यावर हद्दपार होण्याची वेळ येते, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये भावना जवाहरलाल लोढा (वय ३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटव्ो ऊर्फ बुलेट (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद…
साईमत, लातुर : प्रतिनिधी राजस्थानच्या कोटा या ठिकाणी देशभरातले विद्यार्थी परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. रविवारी दुपारी नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (१७ वर्षे) हा विद्यार्थी कोटा या ठिकाणी शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उजना गावातल्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे.अविष्कारचे आई आणि वडील हे दोघंही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते वास्तव्य करतात. यांचा मोठा मुलगा आणि अविष्कारचा मोठा भाऊ हैदराबादमध्ये शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं शिक्षणही कोटामधून पूर्ण झालं आहे. त्यानंतर अविष्कारही कोटा या ठिकाणी शिक्षणासाठी गेला होता. अविष्कारने आत्महत्या का केली ? हे…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण वसंतराव पाटील यांना राष्ट्रीय सामाजिक कला साहित्य एकता संमेलनात क्रीडा पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक राष्ट्रीय कर्तृत्व सन्मान पुरस्कारने सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ.कांशिराम धोंडगा, विनोद ढगे, गणेश अमृतकर, राजेश जाधव हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्ल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुदर्शन पाटील. डॉ.रितेश पाटील, पिपल्स बॅक संचालक विकास वाघ, ॲड. अविनाश भालेराव, संजय जडे यांनी अभिनंदन केले आहे.
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्हा पोलीस दलातील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्यां स्पर्धकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे. सरावात सातत्य असेल तर यश मिळणे अवघड नाही. त्यासाठी नियमित किमान अर्धा तास तरी सराव करणे गरजेचे, असा सल्ला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोलीस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धत यश मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण प्रसंगी दिला. जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालयातर्फे गेल्या तीन दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंना पारितोषीक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव पिंप्राळा येथील सेवानिवृत्त सहायक फौजदाराला सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत 3 लाखांची फसवणूक केल्याचीघटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील सेवानिवृत्त सहायक फौजदार पुरुषोत्तम सुपडू लोहार (वय 63) हे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडे निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होती. त्यावेळी मुंबई येथील भैय्या पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैय्या पाटील यांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील पिंप्राळा परिसरातील कोळीवाड्यात शनिवारी दुपारी १२.३० गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा भागातील कोळीवाडा परिसरात घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती रामांनगर पोलिसांना मिळाली. पोलीस पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, रविंद्र चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार यांनी शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कारवाई केली. यात कपिल रमेश सपकाळे (वय२०) रा.कोळीवाडा, पिंप्राळा हा बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला. त्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळील ३५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली.…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव छावा मराठा युवा महासंघाची पदाधिकारी नियुक्तीची बैठक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत संघटनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नियुक्ती विविध पदांवर करण्यात आली. यामध्ये अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कायदेविषयक सल्लागारपदी शिवसेना शिंदे गटाचे लिगल सेलचे जिल्हा प्रमुख ॲड.राजेश पावसे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती तसेच महिला आघाडीच्या महानगरध्यक्षा निलूताई इंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन उपाध्यक्षपदी नीताताई सांगोळे व विद्याताई झनके यांची तर महिला आघाडीच्या महानगर कार्यकारिणी सदस्यपदी योगिताताई सुतार, उज्ज्वलाताई सपकाळे , चंदाताई इंगळे व श्रीमती सिंधुबाई शेगोकर यांची नियुक्ती करण्यात…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने व मिल्लत फाउंडेशन फॉर एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बंगळूर यांच्या सौजन्याने शनिवार ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथील बीडीएस डॉ. डॉ. अब्दुल रहीम शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रफिक पटवे यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. डॉ.चांद खान, डॉ.इरफान शेख, इफ्तिखार अहमद व आरिफ शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सय्यद अजहर साहेब (मुंबई) यांनी…