साईमत, जळगाव : प्रतिनिधी मालमत्ता कर हा महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तसेच सद्या मालमत्ता कराची आकारणी ज्या दराने केली जाते ते दर नगरपालिका अस्तित्वात असतांना २००१-०२ या वर्षात निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर महानगरपालिकेची २१ मार्च २००३ साली स्थापना झाली. म्हणजेच २००१ ते २०२३ या २२ वर्षात मनपाच्या कर आकारणीच्या दरात आजपर्यंत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. तसेच कुठलीच दरवाढ २२ वर्षात करण्यात आलेली नाही. २०२१-२२ या वर्षात मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकरण करण्यात आले परंतु कर आकारणीच्या दरात कुठलाही बदल केला नाही, असे असताना सर्वेक्षण, नवीन मालमत्ता वाढ, क्षेत्रफळात वाढ, वापरात बदल इत्यादी कारणांमुळे मागणीमध्ये वाढ झालेली आहे. ३००…
Author: Saimat
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हाभरात प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी सर्व विभागांचे २१ भाग केले असून एका वेळी चार विभागांची बैठक आयोजित करून त्य्ााच्या महिनाभरातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वच कामांचा यातून पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिऱ्यांनी पदभार घेऊन गुरूवारी एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कामे केली. याचा लेखाजोखा सर्व विभाग प्रमुखांना बोलवून सादर केला. यावेळी कुपोषणाबाबत त्यांनी खबरदारीचे उपाययोजना करण्याचे विभाग प्रमुखांना आदेश देऊन दर आठवड्याला तपासणी करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात मूबलक खत साठा उपलब्ध जिल्ह्यात पूर्वीचा १८ हजार मेट्रिक टन खत साठा होता. बुधवारी ३ हजार मेट्रिक टन गुरुवारी…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यामुळे आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत रॅली काढली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य तयार केले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोषात घोषणा दिल्या. त्यानंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थांनी इस्त्रो (आयएसआरओ) या शब्दाचे मानवी संचालन केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
साईमत, पुणे : प्रतिनिधी यंदा जुलैत चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस दिसत नाही. ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ८ सप्टेंबरपासून २१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीतून फुटून िंशदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत होते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ , म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार हे आमचे दैवत…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्व्ोच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला १.५-०.५ च्या फरकाने पराभूत केले होते. पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर प्रज्ञानंदला पुनरागमन करण्यात अपयश आले. दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत शास्त्रीय फेरीचे दोन्ही गेम अनिर्णित ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यात टायब्रेकर सामना झाला. प्रज्ञानंदने कार्लसनला हरवले असते तर २१ वर्षांनंतर भारतीयाला हे विजेतेपद मिळाले असते. पण तसे झाले नाही. यापूर्वी विश्वनाथन आनंदने २००२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानंदचा जन्मही झाला नव्हता. वयाच्या ७व्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप िंजकल्यानंतर प्रज्ञानंदचे नाव प्रथम प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्याला…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल व पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे.बुधवारी सायंकाळनंतर तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाकडून दापोरा शिवारातून सुमारे ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात असल्याने, वाळू माफियांनी काही ठराविक भागांमधून वाळू उपसा बंद करून, आता दापोरा, नागझिरी या भागांतून उपसा केला जात आहे. त्यामुळे तालुका पोलिसांनी अनधिकृत वाळू उपशासह वाहतूक थांबविण्यासाठी रस्त्यांवर फिरते युनिट तयार केले आहे. बुधवारी दापोरा, धानोरा भागातील अनधिकृरीत्या वाळूचा साठा केल्याची माहिती…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे गुरूवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांनी अनेक मराठी, िंहदी चित्रपटांमध्ये काम केले. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे २२…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी जळगावच्या चिंचोली कुसुंबा येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची गुरूवारी मंत्रालयात भेट घेतली. त्यात जळगाव तालुक्यात चिंचोली – पिंपळे, कुसंबा येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्रालयस्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. यासाठी गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मान्यतेमुळे चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता दिल्याने रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय निघणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…
साईमत, कळवण : प्रतिनिधी कपालेश्वर येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. विरेंद्र आवारे यांनी मद्यधुंद अवस्थेत प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करुन घेतले नाही. सदर महिलेला डांगसौंदाणे येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिली. यावरुन संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग एकीकडे गरोदर महिला, प्रसूती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असताना ग्रामीण भागात मात्र याच आरोग्य यंत्रणेचे शिलेदाराकडून या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत.22 ऑगस्ट रोजी रात्री अकराला खडकी (ता. कळवण) येथील कल्पना भोये यांना त्यांच्या कुटुंबियांनी प्रसुतीसाठी कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे यांनी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीस आरोग्य…