खान्देशात दमदार पावसाची प्रतिक्षा, पेयजलाचेही संकट

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. खान्देशात सर्वत्र दमदार पाऊसच झाला नाही. त्यामुळे पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी लावलेली पिके जगवायची तरी कशी, असा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील खान्देशातील तिनही जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दुसरीकडे खरीप हंगामाची पिके देखील धोक्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आली असून, पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच दूबार पेरणीची व्ोळ देखील आता निघून गेली असल्याने नव्याने पेरणी करण्याची व्ोळ आली तर पैसा कुठून आणणार ही िंचता शेतकऱ्यांना सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here