आडगावला ऊसाच्या शेतात बिबट्या आणि बच्छडांचा वावर, ग्रामस्थ भयभीत

0
3

साईमत, आडगाव ः प्रतिनिधी

येथील प्रवीण नामदेव पवार यांच्या उसाच्या शेतात बिबट्या व त्याचे दोन बछडे आढळले. प्रवीण पवार यांचा मुलगा शिवप्रसाद ऊर्फ सोमनाथ हा शुक्रवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास उसाच्या शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याचे लहान दोन बछडे आढळले. शिवप्रसाद हा कामात व्यस्त असताना बिबट्याने डरकाळी फोडली व त्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कसाबसा जीव वाचवत शेताबाहेर येऊन इतरांना माहिती दिली. दरम्यान, ग्रामस्थ येईपर्यंत मादी एका पिलाला घेऊन पसार झाली. दुसरे पिल्लू मात्र तेथेच असून, त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here