अजित पवार कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास तयार

0
3

साईमत, मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतिंसह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतिंसह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही व्ोळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असे मिश्किल विधानही त्यांनी केलं आहे.
भगतिंसह कोश्यारी यांनी ‌‘इंडिया टुडे‌’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही व्ोळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही व्ोळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात, असे कोश्यारी यांनी म्हटले.

संघटनेत अजित पवारांची ताकद
मला कधी, कधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. अर्थात, प्रत्येकांचे एक व्यक्तिमत्व असते,असेही भगतिंसह कोश्यारी म्हणाले.

शरद पवारांचा आदर करतो
शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत, असे कौतुक भगतिंसह कोश्यारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here