Author: Saimat

साईमत, प्रतिनिधी, जळगाव रक्षाबंधनासाठी यंदा भावाला नजर लागू नये यासाठी खास इव्हिल आय राखी बाजारात दाखल झाली आहे. इतकेच नव्हे तर एडी, फॅन्सी, पेंडल, स्टोन, झरदोजी, लुंबा, लाँग डोरी राखी हे राख्यांचे प्रकारही पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर किड्स, पर्यावरणपूरक सीड राखी व कपल राखी (भय्या-भाभी) अशा अनेक प्रकारच्या राखी असून, सोने- चांदीच्या राखीच्या वेगवेगळ्या डिझाइनचीही क्रेझ वाढली आहे. यंदा बाजारात 300 पेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. शहरात अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथून येणाऱ्या राख्यांची अधिक विक्री होते. पण, स्थानिक राख्यांनाही मागणी दिसते. एक रुपयापासून ते आठ हजार रुपयांपर्यंत राखी बाजारात आहे. कार्टून राखी 10 ते 130 रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ॲड. रोहिणीताई एकनाथराव खडसे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या सभारंभात पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुपियाताई सुळे, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी सहकार मंत्री आ.बाळासाहेब पाटील, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आ. एकनाथराव खडसे, आ. शशिकांत शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले आदि मान्यवर उपस्थित होते. ॲड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा असून विद्यमान संचालिका आहेत. त्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्यादेखील अध्यक्षा आहेत. पक्षाचे…

Read More

साईमत, प्रतिनिधी जळगाव श्रावण पौर्णिमा ही नारळी पैर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि संस्कृतदिन म्हणून साजरी करण्यात येते. बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक, प्रेम, आणि आपुलकी दृढ करण्यासाठी, रेशमाच्या धाग्यातून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व समजण्यासाठी मंगळवारी कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिन आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश चौधरी आणि विभाग प्रमुख राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. दोनही विभागात सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश चौधरी आणि विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे आणि संस्कृत ग्रंथाचे पूजन करण्यात…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालयातील क्रीडापटूंचा सत्कार आयोजीत केला होता. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा.डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका घाटे व अक्षया दानी या विद्यार्थिनींनी केले. क्रीडा विभागाचे राहुल धूळनकर व ममता प्रजापत यांनी सहकार्य केले.…

Read More

साईमत, प्रतिनिधी जळगाव शहरातील नेरीनाका पांझरापोळ येथे श्रावण महिन्यानिमित्त भव्य पाच दिवसीय संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हा पवित्र संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रशासक विशाल सुरेश भोळे यांनी दिली. श्रावण मासानिमित्त्ा उत्तर प्रदेशातील श्रीधाम वृंदावन येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिव कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांच्या मुखातून संगीतमय शिव महापुराण कथा सादर होईल. या शिवकथेचे अमृत श्रवण करण्याचे पुण्य लाभण्यासाठी भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांनी सोमवारी सायंकाळी कथास्थळी पाहणी दरम्यान…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव मानसिक आजाराच्या विळख्यात सन 2004 पासून अडकलेल्या 38 वर्षीय रुग्णाची प्रकृती आता हाताबाहेर जात होती. तेवढ्यात त्यांना डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. पाच लोकांनी धरुन त्याला रुग्णालयात दाखल केले असता मानसोपचार तज्ज्ञांनीदेखील सावधगिरी बाळगून खात्रीशीर उपचार केले आणि अवघ्या 24 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तो रुग्ण नॉर्मल झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील एक महिन्यापूर्वी एका 38 वर्षीय रुग्णाला डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागात आणण्यात आले. येथील मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाशी संवाद साधला. यात रुग्णाला विनाकारण भीती वाटायची, संशय येत असे, कानात वेगवेगळे आवाज येत असत. तसेच तो शिवीगाळही करायचा. एके दिवशी तर रस्त्याने…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील तांबापूर परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील तांबापूर परिसरातील तस्लीमबी मोहम्मद सैय्यद (वय60) ही वृद्ध महिला बकरी ईदच्या निमित्ताने 26 जून ते 7 जुलैदरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 48 हजारांचा मु्‌‍द्देमाल लांबवला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सोमवारी येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील 224 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कालखंडात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान फार मोलाचे…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी,२९ ऑगस्टरोजी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला व्ोग आल्याचं दिसून येत आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातले आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पहिल्यासारखे एकछत्री सरकार आता नाही. वरती भाजप, धड शिवसेनेची तर हातपाय राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले सरकार आहे. तरीही आम्ही कामे करत आहोत. तुम्हीही पालकमंत्री होता. तुमच्या काळात साधी एस. टी. चालकांची भरती झाली नाही, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली. शिवसेनेतर्फे आगामी निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात गणनिहाय मेळाव्ो घेण्यात येत आहेत. तालुक्यातील भादली येथील मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. टीका करणाऱ्यांना त्यांनी या सभेत आव्हान दिले. मंत्री पाटील म्हणाले, आम्हाला कोणावर ठपका ठेवायचा नाही. आम्ही शिंदे गटात गेल्यानंतर…

Read More